SCERT स्वाध्याय १० वा आठवडा | SCERT SWADHYAY
SCERT स्वाध्याय १० वा आठवडा (SCERT SWADHYAY) सुरु झालेला आहे. मागील SCERT स्वाध्याय ९ व्या आठवड्यात २५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. SCERT स्वाध्याय उपक्रमामुळे मुलांना लोकप्रिय Whatsapp च्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला एका नविन विषयावरील प्रश्नांचा सहजपणे सराव करता येत आहे. विशेष म्हणजे एका मोबाईल मधून एकापेक्षा अधिक विद्याथी सराव करू शकतात. मराठी, उर्दू, सेमी इंग्रजी माध्यमातील मुलांना सराव करता येतो. या सराव प्रश्नामध्ये आवश्यक तिथे चित्रांचा प्रभावी वापर तसेच एखादा प्रश्न चुकल्यास संबंधित संकल्पना आधारित दिक्षा App वरील शैक्षणिक व्हिडिओ लिंक उपलब्ध करून दिले आहे. त्याचा विद्यार्थी अधिक सराव करू शकतात.
SCERT स्वाध्याय १० व्या आठवड्यामध्ये SWADHYAY वर १ली ते १०वी च्या विद्यार्थ्यांना मराठी आणि उर्दू माध्यमावर भाषा विषयाच्या प्रश्नानाचा सराव करता येणार आहे.
चला तर सरावाला सुरुवात करूया!!!
SWADHYAY सोडवीण्याकरिता सन २०२१-२२ मध्ये विभाग निहाय वेगळा Whatsapp नंबर देण्यात आला आहे. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि आपल्या जिल्ह्याच्या लिंकवर क्लिक करून SCERT स्वाध्याय सुरु करा.
सर्व विद्यार्थ्यांना शुभेछ्या !
EduNews या शैक्षणिक वेबसाईटवरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.