युनिव्हर्सल पास कसा काढायचा? | Universal Travel Pass Online Registration 2021

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास कसा काढायचा? | Universal Travel Pass Online Registration 2021

Universal Travel Pass Online Registration 2021कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोना सोबत जगत आहे. नुकतीच देशांमध्ये कोरोणाची दुसरी लाट येऊन गेली, मात्र सध्या तरी कोरोना रुग्ण संख्या कमी असेल, तरी येणाऱ्या काळामध्ये कोरोनाचे तिसरी लाट येईल की नाही हे सध्यातरी सांगता येत नाही. मात्र प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना लसीकरण सध्या सुरू आहे सुरुवातीला जेष्ठ नागरिक, गंभीर आजाराने ग्रस्त रुग्ण, त्यानंतर सर्वसामान्य व्यक्तींना प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात आले. लॉकडाऊन च्या काळामध्ये आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई पास बंधनकारक करण्यात आली होती. 

मात्र आता ज्या व्यक्तींचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहे. अशा व्यक्तींसाठी शासनाने आता युनिवर्सल पास (Universal Pass) देऊ केली आहे. या Universal Pass द्वारे सार्वजनिक प्रवास, रेल्वे प्रवास, विमान प्रवास तसेच मॉल शॉपिंग मध्ये उपयोग करता येणार आहे. युनिवर्सल पास कशी काढावी? या बद्दलची सविस्तर माहिती पाहूया हा लेख अवश्य काळजीपूर्वक वाचावा.

युनिव्हर्सल पास नोंदणी कशी करावी? | How do I register for universal pass?

ज्या व्यक्तींचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहे. अशी व्यक्ती Universal Pass साठी online पद्धतीने Universal Pass Online Registration करू शकतात. नोंदणी करण्यासाठी खालील स्टेप Follow करा.

 • सर्वप्रथम गुगल सर्च मध्ये Universal Pass असे टाईप करून सर्च करा. 
 • आता आपल्या समोर https://epassmsdma.mahait.org/login.htm ही पहिली वेबसाईट दिसेल ती ओपन करा.
 • किंवा गुगल मध्ये https://epassmsdma.mahait.org/login.htm असे सर्च करून Universal E Pass च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 
 • आता Universal Pass वेबसाईटच्या Dashboard वर Citizen या सेक्शन मध्ये Universal pass for double vaccinated citizen या मेन्यू वर क्लिक करा.
 • आता याठिकाणी आपण लसीकरण करताना जो मोबाईल नंबर दिला होता तो येथे टाका. (Please use mobile number which is used in COWIN Registration)
 • आता आपल्या मोबाईल वर एक OTP येईल तो टाका आणि Submit करा.
 • आता आपली सर्व माहिती दिसेल तिथे Generate Pass या मेन्यू ला ओके करा.
 • आता आपली संपूर्ण माहिती दिसेल सर्व माहिती वाचून आपला पासपोर्ट फोटो अपलोड करा आणि Submit करा.
 • दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस होणे आवश्यक आहे. त्यानंतरच Universal Pass Generate होईल.
 • आता आपल्या समोर एक नोटीफिकेशन दिसेल, Universal pass will be send to you in 24 Hrs on SMS
 • आता लगेचच पुन्हा लॉगीन करा. वर सांगितल्याप्रमाणे View Pass असा ऑप्शन दिसेल नाही दिसल्यास २४ तास वाट बघावी, त्यानंतर पुन्हा लॉगीन करावे. 
 • View Pass  वर क्लिक केल्यास आपला Universal Pass तयार झालेला दिसेल तिथे खाली Download या बटनावर क्लिक करून पास डाउनलोड करून घ्यावा.

अशा पद्धतीने आपण Universal Pass साठी Online Registration करून Universal Pass Download करून घेऊ शकता. आणि त्याचा वापर Universal Travel Pass , universal travel pass railway, विमान प्रवास तसेच मॉल शॉपिंग साठी पासचा उपयोग करता येईल.

Post a Comment (0)
Previous Post Next Post