National Nutrition Week 2023 : 'सप्टेंबर पोषणमाह' निमित्त पाककृती स्पर्धेचे आयोजन, स्पर्धेत सहभागी व्हा आणि मिळवा रोख बक्षिसे, सविस्तर जाणून घ्या...

National Nutrition Week 2023 : प्रधानमंत्री पोषणशक्ती (Pradhan Mantri Poshan Shakti) निर्माण योजनेअंतर्गत राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शाळा तसेच तालुकास्तरावर National Nutrition Week 2023 - 1st to 7th September & Month 15 सप्टेंबर या कालावधीत  शाळा व तालुकास्तरावर पाककृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या स्पर्धकास रोख बक्षिसे देण्यात येणार आहे.

$ads={1}

तृणधान्ययुक्त आहाराने रहा निरोगी आणि सुदृढ!

National Nutrition Week 2023

सद्यस्थितीमध्ये राज्यामध्ये शाळांमधून मोठ्या प्रमाणात शाळा व्यवस्थापन समिती SMC, पालक, विद्यार्थी व शिक्षक यांनी सहकार्याने परसबाग विकसित केलेल्या आहेत. विकसित करण्यात आलेल्या परसबागेतील उत्पादीत भाजीपाल्याचा समावेश नियमितपणे आहारामध्ये देखील करण्यात येत आहे. केंद्र शासनाने देखील आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने तृणधान्य विषयक जनजागृती करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

बदलत्या जीवनशैलीत जंकफूड खाण्याच्या सवयीमुळे आपल्या आहारातून पौष्टिक वापर कमी होत चालला आहे. वास्तविकत: पौष्टिक तृणधान्यांचा उपयोग आपल्या रोजच्या ऊर्जेच्या गरजा भागवण्यासाठी होणे आवश्यक आहे. आपला आहार हा कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वानी समृध्द असणे आवश्यक आहे. सदर गरज तृणधान्यामधून भागविणे शक्य आहे. 

विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच तृणधान्ययुक्त आहाराची सवय लावणे आवश्यक आहे. याकरीता तृणधान्यापासून निर्मित विविध पाककृतींचा समावेश दैनंदिन आहारामध्ये केल्यास मुलांना वेगळपणा मिळेल व सदरचा आहार विद्यार्थी आवडीने खाऊ शकतील.

'सप्टेंबर पोषणमाह' निमित्त पाककृती स्पर्धेचे आयोजन

राष्ट्रीय पोषण सप्ताह 2023 ची थीम : 'सर्वांसाठी परवडणारा निरोगी आहार' आहे. [The theme for National Nutrition Week 2023 - 'Healthy Diet Gawing Affordable for All' ]

देशामध्ये "सप्टेंबर" महिना पोषणमाह (Poshanmah) म्हणून साजरा करण्यात येत आहे. याअनुषंगाने राज्यामध्ये दि. ०१ सप्टेंबर २०२३ दि. १५ सप्टेंबर, २०१३ या कालावधीमध्ये National Nutrition Week 2023 - 1st to 7th September शाळा व तालुकास्तरावर पाककृती स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी पाककृती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

शाळास्तरावर पालक, नागरिक व योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्यासाठी तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धांचे आयोजन करून, एका उत्कृष्ट पाककृतींची निवड तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचे आयोजन सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये करण्यात येणार असून, शाळा परिसरातील जास्तीत जास्त माता पालक या उपक्रमांमध्ये सहभागी होतील याकरीता जनजागृती करणेत येत आहे. शाळास्तरावरील प्रथम क्रमांकाच्या पाककृतींची स्पर्धा तालुकास्तरावरील स्पर्धा दुस-या आठवडयामध्ये घेण्यात येईल.

$ads={2}

तालुकास्तरावरील सर्वोत्कृष्ट पाककृतींसाठी प्रथम क्रमांकास रु.५०००, द्वितीय क्रमांकास रु.३५०० आणि तृतीय क्रमांकास रु. २५०० रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे.

उत्कृष्ट पाककृतीची निवड ही तृणधान्यातील पौष्टिकता, तृणधान्याचा दैनंदिन आहारातील उपयोग तृणधान्याचा आरोग्यविषयक लाभ, तृणधान्याची चव मांडणी व नाविण्यपूर्णता, पाककृती बनविण्याची कृती सुलभता व इंधन बचत या निकषांच्या आधारे करण्यात येणार आहे. परिपत्रक येथे पहा

Previous Post Next Post