राज्यातील विद्यार्थ्यांसाठी नवीन अपघात विमा योजना! राज्य सरकारचा मोठा निर्णय!

Personal Accident Insurance: उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णय 16 ऑक्टोबर नुसार विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक स्वरुपाची विद्यार्थी वैयक्तीक अपघात विमा (Personal Accident Insurance) तसेच विद्यार्थी वैद्यकीय विमा (Medical Insurance)  नवीन स्वरूपात लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे, सविस्तर वाचा..

$ads={1}

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी नवीन अपघात विमा योजना!

Personal Accident Insurance

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णय दिनांक २ जून २०२१ नुसार राज्यातील अकृषी विद्यापीठे, तंत्र विद्यापीठ व अधिनस्त महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन स्वरूपात 'विद्यार्थी जीवन अपघात विमा योजना' लागू करण्यासाठी संचालक, उच्च शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती.

सदर समितीच्या अहवालानुसार राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी 'विद्यार्थी अपघात विमा' योजना नवीन स्वरुपात लागु करण्यासंदर्भात, IRDAI परवानाधारक एक अनुभवी सल्लागार नेमून, त्यांना या विषयाबाबत सखोल अभ्यास करून अंमलबजावणी करण्यासारख्या बाबी तसेच त्यांच्या कार्यपध्दतीबाबत अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.

संचालक उच्च शिक्षण यांनी, निविदा छाननी समितीने तांत्रिक मुल्यमापन करून गुणांकनाच्या आधारे 'Integrated Risk Insurance Broker Limited' या विमा सल्लागार कंपनीची निवड केली होती.

त्यानुसार विद्यार्थी अपघात विमा योजना संदर्भात विमा संचालनालय यांचे राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित करण्यात आलेली विद्यार्थी अपघात योजना संदर्भात अभिप्राय घेण्यात आले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित बाबत लेटेस्ट न्यूज वाचा

IRDAI परवानाधारक सल्लागार तसेच विमा संचालनालय यांचे सुचनांनुसार अकृषी विद्यापीठे तसेच संलग्नित महाविद्यालये येथे विद्यार्थी वैयक्तीक अपघात विमा (Personal Accident Insurance) तसेच विद्यार्थी वैद्यकीय विमा (Medical Insurance) अंमलात आणण्यासाठी IRDA परवानाधारक विमा कंपनी निवडण्यासाठी ई-निविदेद्वारे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार दि.२७ सप्टेबर २०२३ च्या प्रस्तावानुसार विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

अकृषी विद्यापीठे तसेच संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक स्वरुपाची विद्यार्थी वैयक्तीक अपघात विमा (Personal Accident Insurance) तसेच विद्यार्थी वैद्यकीय विमा (Medical Insurance) खालीलप्रमाणे अंमलात आणणेबाबत सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

Personal Accident Medical Insurance

संबंधित विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालये यांचेकडून उपरोक्त नमूद तक्त्यातील निविदाधारकांपैकी विमा दर तसेच विमा सरंक्षण याकरिता योग्य वाटत असलेल्या निविदा धारक कंपनीची निवड करुन ऐच्छिक स्वरुपात विद्यार्थी वैयक्तीक अपघात विमा ( Personal Accident Insurance ) व विद्यार्थी वैद्यकीय विमा (Medical Insurance ) योजना विद्यार्थ्यांसाठी लागू करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

$ads={2}

अकृषी विद्यापीठे तसेच संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तीक अपघात विमा (Personal Accident Insurance) तसेच विद्यार्थी वैद्यकीय विमा (Medical Insurance) अनुषंगाने सदरहू Insurance ची Eligibility, Benefits आणि Important Terms & Conditions संदर्भातील महत्वाच्या मुद्द्यांची माहिती शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे. याबाबतची विस्तृत माहिती संचालक, उच्च शिक्षण संचालनालय पुणे यांचेकडून www.dhepune.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. {सविस्तर शासन निर्णय पहा}

हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी ताजे अपडेट पहा - सरकारी कर्मचारी लेटेस्ट न्यूज

केंद्राकडून मिळणार 9 हजार ते 14600 रुपयांची शिष्यवृत्ती

महिला व मुलींसाठी जबरदस्त योजना पहा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा