BEd Course 2024 : दोन वर्षांचे 'ते' बी.एड. बंद; नवीन शैक्षणिक वर्षापासून हा बदल होणार

BEd Course 2024 : देशभरात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (National Education Policy) लागू करण्यात आले आहे, त्याचाच एक भाग म्हणून आता दोन वर्षाचा B.Ed. (Special Education) कोर्स बंद करण्यात आला असल्याचे भारतीय पुनर्वसन परिषद यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे, आता बीएड कोर्स चा कालावधी येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्ष २०२४-२४ पासून वाढविण्यात आला आहे. 

दोन वर्षांचे 'ते' बी.एड. बंद; नवीन शैक्षणिक वर्षापासून हा बदल होणार

BEd Course 2024

B.Ed. (Special Education) दोन वर्षांचा अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. पुढील शैक्षणिक सत्र २०२४-२०२५ पासून केवळ चार वर्षांच्या बी.एड. अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाईल, असे Rehabilitation Council Of India (RCI) च्या परिपत्रकात म्हटले आहे.

NCTE ने नवीन शैक्षणिक धोरण-२०२० (NEP) अंतर्गत एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमात (ITEP) चार वर्षांच्या बी.एड.ची तरतूद केली आहे. त्यामुळे RCI नेही तसा निर्णय घेतला आहे. येत्या सत्रापासून ४ वर्षांच्या अभ्यासक्रमालाच मान्यता मिळेल असे, आरसीआयचे सचिव विकास त्रिवेदी यांनी म्हटले आहे.

नव्या अभ्यासक्रमात काय?

  1. बी.एड.च्या विशेष शिक्षण अभ्यासक्रमात दिव्यांग मुलाना शिकविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते, 
  2. कर्णबधीर, दृष्टिदोष, मानसिक दिव्यांगत्व असलेल्यांना शिक्षण देऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम चालविला जातो. 
  3. चार वर्षांचा अभ्यासक्रम चालवू इच्छिणाऱ्या संस्था अर्ज करू शकतील, असे आरसीआयने म्हटले आहे.

समकक्ष निर्णय - सामान्य व विशेष शिक्षण Ded/ Bed समकक्ष कोर्ट निकाल व शासन निर्णय परिपत्रक

BEd Course 2024
Previous Post Next Post