Employee Medical Bill GR : राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष ४० ते ५० या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्ष ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी (Medical check-up) करिता खर्चाची प्रतिपूर्ती देण्यास शासनाने मान्यता दिली असून, याबाबत महत्वाचा नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित
वर्ष ४० ते ५० या वयोगटातील गृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्ष ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपसणी (Medical check-up) अनुज्ञेय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरीता रु.५०००/- या प्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती गृह विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये "अपवादात्मक बाब" म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक ०८.१२.२०२२ च्या प्रपत्र "अ" येथे नमूद करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयाद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय)
राज्यातील या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, मंत्रिमंडळाची मंजुरी