Old Pension Scheme Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
मोठी बातमी! राज्यातील या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, मंत्रिमंडळाची मंजुरी
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी कार्यरत असलेल्या आणि १२ जुलै २००७ च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने ताब्यात घेतलेल्या पुर्नवसन केंद्रातील राज्यातील २३ कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना (OPS) लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हा पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू झाल्यानंतर त्यांच्याकडून CPF ची जमा झालेली रक्कम सबंधित कर्मचाऱ्यांना जमा झालेल्या व्याजासह अदा करण्यात येईल.
तसेच केंद्र शासनाकडून भरणा करण्यात आलेली CPF ची रक्कम व्याजाच्या रक्कमेसह राज्य शासन खाती जमा करण्यात येईल. शासनाकडून देय असलेली सेवा निवृत्ती नि-उपदानाची रक्कम तसेच निवृत्तीवेतनाची रक्कम तीन हप्त्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येईल.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 9 महत्वाचे निर्णय पहा
आरोग्य विभागातील या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महत्वाची बैठक संपन्न