PMC NHM Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत NHM अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, सविस्तर तपशील पहा

PMC Recruitment 2024 :आरोग्य खाते पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली Integrated Health and Family Welfare Society for Pune Municipal Corporation अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान मध्ये खालील कंत्राटी रिक्त पदे संवर्गनिहाय भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक  १६ जानेवारी २०२४ रोजी सायं. ०६.०० वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे.

पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु

PMC NHM Recruitment 2024

पदांचा तपशील व रिक्त जागा

  1. पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी - 16
  2. बालरोगतज्ञ पुर्णवेळ - 1
  3. स्त्रीरोगतज्ञ अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी - 12
  4. बालरोगत तज्ञ (अर्धवेळ) - 11
  5. प्रयोगशळा तंत्रज्ञ - 5
  6. स्टाफ नर्स (Staff Nurse) - 9
  7. ए.एन.एम (ANM) - 6
  8. एकूण जागा - 60

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) 

  1. उपरोक्त पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता ही वेगवेगळी असून, यामध्ये पद क्रमांक 1 ते 4 साठी उमेदवार MBBS / MD / DCH / MCI/ DNB/MMC/ PEDIA TRIC /MMC अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.
  2. पद क्रमांक 5 साठी बी.एस .सी पदवी व शासकीय संस्था अथवा डी.एम.एल.टी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.
  3. स्टाफ नर्स (Staff Nurse) साठी इयत्ता 12 वी उत्तीर्ण तसेच जी.एन.एम कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.
  4. ए.एन.एम (ANM) साठी इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच ANM कोर्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.

ऑनलाईन अर्ज कोठे व कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक ०२/०१/२०२४ ते १६/०१/२०२४ रोजी सायं. ०६.०० वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, तसेच अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज भरावा.

मूळ जाहिरात डाउनलोड करा
अधिकृत वेबसाईट : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक - https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/


Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा