Nav Bharat Literacy Programme : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (National Educational Policy 2020) अंतर्गत आर्थिक वर्ष सन 2021-22 च्या अर्थसंकल्पीय घोषणांच्या अनुषंगाने सर्वांसाठी (पूर्वीचे प्रौढ शिक्षण - Adult Education) शिक्षणाच्या सर्व पैलूंचा समावेश करण्यासाठी भारत सरकारने आर्थिक वर्ष 2022-2027 या कालावधीसाठी नव भारत साक्षरता ही केंद्र पुरस्कृत नवीन योजना सुरू केली आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमास मान्यता देण्यात आली आहे.
नव भारत साक्षरता कार्यक्रम - साक्षरतेकडून समृद्धीकडे
देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यानुसार केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रमाची सन २०२२ २०२७ या कालावधीसाठी अंमलबजावणी सुरु करण्यात आ आहे. केंद्र शासनाकडून 'जन जन साक्षर' (Jan Jan Sakshar) व राज्य शासनाकडून 'साक्षरतेकडून समृद्धीकडे' ('literacy To Prosperity') हे घोषवाक्ये देण्यात आले आहे.
जागतिक साक्षरता दिन
दिनांक ८ सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनाचे (World Literacy Day) औचित्य साधून संपूर्ण देशात दिनांक १ सप्टेंबर ते दिनांक ८ सप्टेंबर या कालावधीमध्ये 'साक्षरता सप्ताह ('Literacy Week') राबविणेबाबतचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे.
21 व्या शतकातील कौशल्य - 21st Century Skills
नव भारत साक्षरता योजनेचा उद्देश केवळ मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रच नाही तर 21व्या शतकातील नागरिकांसाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे (21st century skills) जीवनकौशल्य आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता, व्यावसायिक कौशल्ये, आरोग्य सेवा आणि जागरूकता, मुलांची काळजी आणि शिक्षण आणि कुटुंबासह प्रदान करणे हा आहे.
सदरच्या 'साक्षरता सप्ताह' कालावधीमध्ये जिल्हा साक्षरता अभियान प्राधिकरण व विविध स्वयमेव संस्थांच्या सहकायनि वार्ड/गाव/ शाळा/महाविद्यालय स्तरावर आयोजित करावयाचे उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमांतर्गत निरक्षरांना प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन दि.८ सप्टेंबर २०२३ या जागतिक साक्षरता दिनी राज्यात सुरू करण्यात येण्यार आहे. सदरच्या अध्ययन-अध्यापनासाठी निपुण भारत अंतर्गत उपलब्ध दिक्षा पोर्टलवरील FLN व्हिडीओ यांची मदत घेण्यात येणार आहे.
उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रम
राज्यामध्ये या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत सूचित करण्यात आलेले आहे. सदर साक्षरता सप्ताह दरम्यान [Ullas Nav Bharat Literacy Program] उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा लोगो, घोषवाक्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवावेत, विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवक यांना योजनेत स्वयंस्फूर्तीने भाग घेण्यासाठी व उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम Mobile App वर व नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईट - https://nilp.education.gov.in/nilp ला भेट द्या.
शैक्षणिक - 'सप्टेंबर पोषणमाह' निमित्त पाककृती स्पर्धेचे आयोजन, स्पर्धेत सहभागी व्हा