राज्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्धतेसह, 17 हजार पेक्षा अधिक पदांची होणार भरती!

Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पोषण आहारात महत्वाची भूमिका असून गेल्या सहा वर्षापासून पोषण माह सप्ताह राज्यभरात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याच योगदानामुळे यशस्वी होतांना दिसत आहे. राज्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्धतेसह १७ हजार पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती करण्यात येणार  असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. आज जिल्ह्यातील घोटी, तालुका इगतपुरी येथे राष्ट्रीय पोषण माह राज्यस्तरीय  अभियानाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

Anganwadi Bharti 2023

बालकांच्या शिक्षणाचा पहिला श्रीगणेशा हा अंगणवाडीतूनच होत असून अंगणवाडी सेविका त्यांचा पहिला गुरू आहे. मुल जन्मास येण्यापूर्वी व जन्मास आल्यांनतरही माता व बालक यांच्या पोषण आहाराची काळजी अंगणवाडी सेविका या जबाबदारीने पार पाडत आहे. कोरोना कालावधीतही हातात थर्मामीटर व ऑक्सीमीटर घेवून गावातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीत या सेविका अग्रेसर होत्या. स्त्री हा कुटूंबाचा कणा असून ती स्वत: सुदृढ असेल तर तिचे कुटूंबही सुदृढ राहते.

० ते ६ वयोगटातील बालकांचे संगोपन महत्वाचे असून सुपोषीत भारताची संकल्पना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये मांडली आहे. राज्यात गेल्या सहा वर्षापासून राबविण्यात येणाऱ्या पोषण माह उपक्रमात महाराष्ट्र राज्य हे देशात तिसऱ्या क्रमांकावर असून याचे पूर्ण श्रेय हे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जाते. सुपोषीत भारत अंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमात नाशिक जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. अशा शब्दात मंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थित सेविका व मदतनीस व जिल्हा प्रशासानाचे  कौतुक केले.

कर्मचारी अपडेट्स - मोठी बातमी! जुनी पेन्शन योजना - कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज - मोठा निर्णय!- कर्मचार्यांना वाढीव मोबदला

डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून पुढील वर्षापासून दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मतदनीस यांच्या कुटूंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली.राष्ट्रीय पोषण अभियानात अधिकाधिक उपक्रम राबवून महाराष्ट्र राज्याचा  देशात पहिला क्रमांक आणण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया, असे आवाहनही मंत्री कु. आदिती तटकरे यांनी यावेळी केले.

शैक्षणिक - राज्यातील तिसरी ते आठवीच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय - शिष्यवृत्ती परीक्षा मोठी अपडेट बातमी वाचा

कार्यक्रमात ६ महिने पूर्ण झालेल्या बालकांना अन्न प्राशन कार्यक्रम, गर्भवती माता कौतुक सोहळा, माझी कन्या भाग्यश्री अंतर्गत लाभार्थी यांना धनादेश वाटप, बेबी केअर किटचे वाटप, अंगणवाडी मतदनीस पदावरील नियुक्ती आदेश वाटप, महिला बचत गटांना कर्ज धनादेश वाटप,अंगणवाडी सेविका विशेष पुरस्कार आणि गुणवंत अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार मंत्री महोदय व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  सिमा पेठकर यांनी केले तर आभार दिपक चाटे यांनी मानले.

Previous Post Next Post