Education Policy 2023 : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन संदर्भात सरकारचा मोठा निर्णय! महत्वाचे शासन परिपत्रक निर्गमित

Education Policy 2023 : राज्य सरकारने यंदा तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या चाचण्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे, यंदा या वर्गातील विद्यार्थ्यांच्या संपूर्ण वर्षभरात तीन चाचण्यांचे नियोजन करण्यात आले असून, नुकतीच पायाभूत चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते, आता संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ पुन्हा नव्याने घेण्याची आवश्यकता नसून, संकलित चाचणीत मिळणारे गुण हे  सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदवहीमध्ये घेण्याबाबत दिनांक ३१ ऑगस्ट रोजीच्या शासन परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. सविस्तर पाहूया..

$ads={1}

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन संदर्भात सरकारचा मोठा निर्णय! 

Education Policy 2023

पायाभूत चाचणी दिनांक १७.०८.२०२३ ते १९.०८.२०२३ या कालावधीत घेण्यात आलेली आहे. तर संकलित मूल्यमापन चाचणी सत्र १ व संकलित मूल्यमापन चाचणी सत्र २ यांचे वेळापत्रक व अभ्यासक्रम आणि गुणदान संदर्भात महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

STARS प्रकल्प मधील SIG २ (Improved Learning Assessment systems) २.२ अंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यास अनुसरून २०२३ २४ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन नियतकालिक चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. एकूण दहा माध्यमात चाचणी होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या तीन विषयांची इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

यास अनुसरून राज्यातील इयत्ता तिसरी ते आठवी च्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (विद्यानिकेतन/सराव पाठशाळा, समाजकल्याण विभाग (शासकीय), आदिवासी विकास (शासकीय), जिल्हा परिषद, मनपा, नपा, नप, शासकीय सैनिकी शाळा, कटक मंडळ, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल) या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक चाचण्यांचा पुरवठा राज्यस्तरावरून करण्यात येणारआहे.

शिष्यवृत्ती Exam संदर्भात मोठी अपडेट!

वेळापत्रक

पायाभूत चाचणी दिनांक १७.०८.२०२३ ते १९.०८.२०२३ या कालावधीत घेण्यात आलेली आहे. तर संकलित मूल्यमापन चाचणी सत्र १ व संकलित मूल्यमापन चाचणी सत्र २ यांचे खालील प्रमाणे आयोजन करण्यात येणार आहे.

  • संकलित मूल्यमापन चाचणी सत्र माहे ऑक्टोबर २०२३ शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबर पहिल्या आठवड्यात तर संकलित मूल्यमापन चाचणी सत्र २ माहे एप्रिल २०२४ पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार आहे.

संकलित मूल्यमापन चाचणीचा अभ्यासक्रम

  • संकलित मूल्यमापन सत्र १ प्रथम सत्रातील अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल
  • संकलित मूल्यमापन सत्र २ द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.

$ads={2}

सन २०२३ २४ या शैक्षणिक कालावधीत इयत्ता ३ री ते ८ वी च्या इयत्तांसाठी तीन चाचण्या घेण्यात येणार आहेत. संकलित मूल्यमापन चाचणी सत्र १ व २ या संकलित मूल्यमापन चाचणीच्या अनुषंगाने आहेत. यामुळे शाळांनी इयत्ता ३ री ते ८ वी (प्रथम भाषा, गणित व इंग्रजी) या विषयांच्या संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ पुन्हा नव्याने घेवू नयेत. उपरोक्त चाचणीत मिळालेले गुण हे संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण समजण्यात यावेत. या चाचण्यांची गुणनोंद सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदवहीमध्ये घेण्यात यावी. तसेच इतर विषयांच्या चाचण्या शिक्षकांनी आपल्या स्तरावर राज्यस्तर चाचणीच्या धर्तीवर तयार करून संकलित १ व २ चे मूल्यमापन करावे.

शासन परिपत्रक येथे डाउनलोड करा

Previous Post Next Post