Scholarship Exam 2023 : मोठी अपडेट! राज्यातील इयत्ता 5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारीला, ऑनलाइन अर्ज सुरु

Scholarship Exam 2023 : राज्यातील पूर्व, उच्च प्राथमिक इयत्ता 5 वी (Pre Secondary Scholarship Examination) आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा (Pre Upper Primary Scholarship Examination) दि. 18 फेब्रुवारी, 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास दिनांक 1 सप्टेंबर 2023 पासून सुरुवात झालेली आहे.

$ads={1}

राज्यातील इयत्ता 5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारीला, ऑनलाइन अर्ज सुरु

Scholarship Exam 2023

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी , पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी बरोबरच विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ.५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 18 फेब्रुवारी,2024 रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना परीक्षा परिषदेने जारी केली आहे. या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर दि. 1/9/2023 रोजी पासून उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

शिष्यवृत्ती रकमेत भरघोस वाढ

राज्यातील शालेय विद्यार्थ्याना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती रकमेत भरघोस वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उच्च प्राथमिक शाळा (Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) व माध्यमिक शाळा (Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS)  इयत्ता 5 वी आणि 8 वी  शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये पात्र विद्यार्थ्यांना Educational Scholarship देण्यात येते. या शिष्यवृत्ती मध्ये तब्बल 13 वर्षानंतर भरीव वाढ करण्यात आली आहे, तसा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने दिनांक 3 जुलै 2023 रोजी जारी केला आहे. 

त्यानुसार इ. 5 वीच्या सर्व संचांकरीता रु.500/- प्रतिमाह प्रमाणे (रु.5000/- प्रतिवर्ष) व इ. 8 वीच्या सर्व संचांकरीता रु.750/- प्रतिमाह प्रमाणे (रु.7500/- प्रतिवर्ष) इतकी भरीव वाढ करण्यात आलेली आहे.

परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी असे कळविण्यात आले आहे.

Scholarship Examination 2023

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता | Eligibility for Scholarship Examination

  1. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे.
  2. विद्यार्थी शासनमान्य शासकीय / अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इ. 5 वी किंवा इ. 8 वी मध्ये शिकत असावा.

शिष्यवृत्ती परीक्षा महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरुवात - दिनांक 1 सप्टेंबर 2023 
  • अंतिम तारीख - दिनांक 30 नोव्हेंबर 2023

Scholarship Examination 2023

$ads={2}


शिष्यवृत्ती परीक्षा अधिसूचना येथे डाउनलोड करा
शिष्यवृत्ती परीक्षा संपूर्ण माहिती येथे पहा
शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज येथे करा

Previous Post Next Post