Teachers Day 2023 : राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी 108 शिक्षकांची निवड, 5 सप्टेंबर शिक्षक दिनी होणार वितरण, जाणून घ्या कोण आहेत या वर्षीचे विजेते

5 September Teachers Day Award 2023 : दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिन या दिवशी राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर आदर्श शिक्षकांना पुरस्कार वितरीत करण्यात येतात, यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून एकमेव महिला शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे, तर कांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्यातून 108 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे, या आदर्श शिक्षकांना दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिनी पुरस्कार वितरण कार्यक्रम मुंबई येथे होणार आहे.

$ads={1}

राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी 108 शिक्षकांची निवड

5 September Teachers Day Award 2023

समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक (Education) क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना (Teachers) त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार (Teacher Award) जाहीर करण्यात येतात. 

राज्य शिक्षक पुरस्कार योजना १९६२-६३ पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून, ती शालेय शिक्षण विभागांमार्फत राबविली जाते. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येत आहे. 

दिनांक १३ जून, २०११ च्या शासन निर्णयान्वये पुरस्काराची रक्कम १०,००० रुपये अदा करण्यात येते. तसेच राष्ट्रीय, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिनांक ४ सप्टेंबर २०१४ च्या शासन निर्णयान्वये ठोक रक्कम रुपये १,००,००० रुपये अदा करण्यात येते. यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार महाराष्ट्रातून एकमेव महिला शिक्षिका मृणाल गांजाळे यांची निवड करण्यात आली आहे.

सन २०२२-२३ च्या कांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दिनांक २५ ऑगस्ट, २०१३ रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली होती. राज्य निवड समितीने शिक्षकांची गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय निवड यादी शासनास सादर केली आहे. त्यानुसार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार घोषित करण्यात आले आहे.

सन २०२२-२३ च्या कातीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर प्रवर्गनिहाय राज्यातील १०८ शिक्षकांची निवड केली आहे. 

जाणून घ्या कोण आहेत या वर्षीचे राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार  विजेते

यावर्षी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्राथमिक 37, माध्यमिक 39, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) 19, थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार 8, विशेष शिक्षक कला/क्रीडा  2, दिव्यांग शिक्षक/दिव्यांग विद्यार्थ्याच्या शाळेतील शिक्षक 1 आणि स्काऊट गाईड 2 असे एकूण 108 जणांना शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहे. यादी खाली दिलेल्या लिंकवर डाउनलोड करा.

$ads={2}

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची नावे येथे पहा

हे ही वाचा - जुनी पेन्शन योजना अपडेट बातमी - OPS Vs NPS फरक - कंत्राटी कर्मचारी महत्वाचा निर्णय

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.


Previous Post Next Post