Children Awards 2023 : विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

Children Awards 2023 : दहावी, बारावीत ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिक/पत्नी यांच्या पाल्यांना १० हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.  आयआयटी, आयआयएम, एम्स (IIT, IIM, AIIMS) अशा नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकाच्या पाल्यांना २५ हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

$ads={1}

Children Awards 2023

तसेच विविध खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी मिळविणारे, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी पार पाडणारे, तसेच देश आणि राज्याची प्रतिष्ठा वाढेल, अशा स्वरुपाची लक्षणीय कामगिरी करणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि पाल्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.  त्यासाठी माजी सैनिकांच्या कुटुंबीयांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास माहिती द्यावी. याबबात अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी कळविले आहे.

जुनी पेन्शन योजना लागू होणार अभ्यास समितीने मागविली माहिती येथे वाचा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा