Cabinet Decision : नवीन वर्षाच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय!

Cabinet Decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ४ जानेवारी मंत्रालयात पार पडलेल्या नवीन वर्षाच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत दहा मोठे निर्णय घेण्यात आले. यावेळी राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर (Nitin Karir) यांना मंत्रिमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या प्रारंभी शुभेच्छा दिल्या.

$ads={1}

नवीन वर्षाच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय!

Cabinet Decision

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत 10 महत्वाचे (Cabinet Decision) निर्णय घेण्यात आले.

मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे - Cabinet Decision

  1. नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर  २००५ नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना (old pension scheme) जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय. कर्मचाऱ्यांना दिलासा
  2. अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित. कारसाठी २५० रुपये
  3. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान.
  4. विदर्भातील  सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार
  5. मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता.
  6. पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान. ४०० उद्योगांना फायदा
  7. रेशीम उद्योगाच्या विकासासाठी "सिल्क समग्र २" योजना राबविणार. रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ
  8. द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबविणार
  9. नांदेड - बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. ७५० कोटीस मान्यता
  10. सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट!
कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, राज्य सरकारचा मोठा निर्णय!

$ads={2}

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा