NHM GR : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजनेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक २ जानेवारी २०२४ रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान महत्वाचा शासन निर्णय निर्गमित
ग्रामीण जनतेस सहजसाहय, परवडयाजोगी, कार्यक्षम, उत्तरायी आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाने संपूर्ण देशात एप्रिल, २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु केले आहे.
सदर योजनेअंतर्गत प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम (Reproductive child Health), नियमित लसीकरण, मिशन प्लेक्सीपुल, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण व पल्स पोलिओ लसीकरण इत्यादी आरोग्य सेवा देण्यात येतात. त्या अनुषंगाने प्रस्तुत प्रकरणी केंद्र व राज्य शासनाचा प्राप्त झालेला निधी सन २०२३-२४ च्या मुळ अर्थसंकल्पीत तरतुदीतून वितरीत करण्यात आला आहे.
त्यानुसार केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सन २०२३-२४ करिता सर्वसाधारण योजनेतून ६०% केंद्र हिश्श्याचे रु.१७१३१.०० लक्ष व ४० % राज्य हिश्श्याकरिता रु.११४२०.६७ लक्ष इतके राज्य हिश्श्याचे अनुदान वितरीत करण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
यामध्ये वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य इतर खर्च, सर्वसाधारण योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, केंद्र पुरस्कृत योजना, ६० टक्के केंद्र हिस्सा व ४० टक्के राज्य हिस्सा सहायक अनुदाने (वेतनेतर) कार्यक्रमासाठी वितरीत करण्यात आले आहे. (शासन निर्णय)
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरुकंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश