राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना संदर्भात अत्यंत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित | State Government Employees Insurance Scheme Calculated Table

State Government Employees Insurance Scheme Calculated Table : राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ अंतर्गत माहे जानेवारी, २०२४ ते माहे डिसेंबर, २०२४ या वर्षामध्ये सदस्यत्व संपुष्टात आल्यास देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठीचा परिगणितीय तक्ता निर्गमित करण्यात आले आहे.

$ads={1}

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना संदर्भात अत्यंत महत्वाचा शासन निर्णय

State Government Employees Insurance Scheme Calculated Table

मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुखांनी दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून राजीनामा, सेवानिवृत्ती किंवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना/कर्मचाऱ्यांच्या वारसांना सोबतच्या तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मृत्यू, सेवानिवृत्ती, राजीनामा इत्यादी कारणांमुळे दि.१ जानेवारी, २०२४ ते दि.३१ डिसेंबर, २०२४ या कालावधीत गटविमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या रु.६०/-प्रमाणे अंशदान करणाऱ्या सदस्यांच्या बचत खात्यामध्ये संचित होणारी बचत निधीची व्याजासह एकूण देय होणारी रक्कम दर्शविणारा तक्ता

State Government EmployeesInsurance Scheme Calculated Table
State Government EmployeesInsurance Scheme Calculated Table

State Government EmployeesInsurance Scheme Calculated Table

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ च्या बचत निधीमधील संचित रकमांवर दि.०१ जानेवारी, २०२४ पासून दर साल दर शेकडा ७.१ टक्के दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज आकारण्यात आले आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ च्या विमा निधीमधील संचित रकमांवर दर साल दर शेकडा ४ टक्के दरात कोणताही बदल झालेला नसल्यामुळे याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्यात यावी. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. (शासन निर्णय)

जुनी पेन्शन योजना लेटेस्ट शासन निर्णय

सातव्या वेतन आयोगानुसार या कर्मचाऱ्यांना मिळणार सुधारित अंशराशीकरणाचा लाभ

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा