Employee Promotion : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करून, कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी कालबद्ध पदोन्नती देताना असलेली 5400 रु. इतक्या श्रेणी वेतनाची (ग्रेड पे) अट आता काढून टाकण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
$ads={1}
राज्यातील या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती; 5400 च्या ‘ग्रेड पे’ची अट काढली
सरकारी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेच्या १०, २०, ३० वर्षांच्या सेवेत तीन टप्प्यांवर जी पदोन्नती (Promotion) दिले जाते, त्यालाच ‘कालबद्ध पदोन्नती’ म्हणतात.
ही पदोन्नती आतापर्यंत ज्या कर्मचाऱ्यांना 5400 रुपयांपेक्षा कमी ग्रेड पे असलेल्या कर्मचाऱ्यांनाच दिली जात होती. मात्र ही मर्यादा काढावी, अशी मागणी संघटनांनी केली होती. आता ही मागणी पूर्ण झाली असून, या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक २७ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
मार्च 2019 च्या शासन निर्णयानुसार तीन लाभाच्या (10:20:30) सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती सेवा योजनेत 1 जानेवारी 2016 पासून लाभ देतांना या कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतनसंरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्याअनुषंगाने शासन निर्णयात सुधारणा करण्यात येणार आहे. (शासन निर्णय येथे डाउनलोड करा)
महत्वाची अपडेट! आरटीई 25 टक्के प्रवेश (2024 25) प्रक्रियेच्या नियमात हा मोठा बदल
आनंदाची बातमी! बक्षी समिती अहवाल खंड 2 स्वीकृत वेतनस्तर सुधारणा नवीन शासन निर्णय