गुड न्यूज ! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ; अखेर शासन निर्णय जारी..

MNRLM Contract Employees Salary Increase : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सद्यस्थितीत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींच्या मानधनात तसेच अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरता निधीमध्ये वाढ करण्यास शासनाने मान्यता दिली असून, समुदाय संसाधन व्यक्ती व कार्यरत प्रेरिका यांच्या मानधनात वाढ करून निधी वितरीत करणेबाबत महत्वाचा शासन निर्णय दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

$ads={1}

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ; अखेर शासन निर्णय जारी

nrlm Contract Employees Salary Increase

या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरापासून ते केंद्रस्तरापर्यत स्वतंत्र, समर्पित व संवेदनशील यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे. सदर अभियान राज्यातील ३४ जिल्हे व ३५१ तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तीं (Community Resource Person-CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी यांना त्यांच्या कामाचे प्रचलित पध्दतीने मुल्यमापन करुन कमाल रु.६०००/- दरमहा मानधन अदा करण्यात येते.

तसेच उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता गटांना सद्य:स्थितीत "अ", "ब" व "क" वर्गवारीत श्रेणीकरण करुन अधिकतम रु.१५,०००/- फिरता निधी (Revolving Fund) वितरीत करण्यात येतो. 

यामध्ये वाढ करुन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनान्वये स्वयंसहाय्यता गटांची वर्गवारी करुन "अ" वर्गवारी प्राप्त होणाऱ्या स्वयं सहाय्यता गटांना रु.३०,०००/- व वर्गवारी "ब" व "क" मध्ये येणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांना प्रचलित पध्दतीने फिरता निधी (Revolving Fund) अदा करण्याबाबत दिनांक २९ सप्टेंबर २०२३ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 

त्यानुषंगाने आता या योजनेसाठी पुरवणी मागणीनुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत समुदाय संसाधन व्यक्तींसाठी वाढीव मानधन व स्वंय सहायता गटांना फिरता निधी (अतिरिक्त राज्य हिस्सा) वाढीव मानधन वितरीत करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. (शासन निर्णय)

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संदर्भात महत्वाची अपडेट! 

राज्यातील या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती; 5400 च्या ‘ग्रेड पे’ची अट काढली

राज्यातील मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा निर्णय!
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा