RTE Admission age Limit 2024 : आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती? मानिव दिनांकावरून काढा प्रवेशासाठी लागणारे वय..

RTE Admission age Limit 2024 : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act 2009) शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील विशेषतः खाजगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी RTE अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते, पुढील सन 2024-25 शैक्षणिक वर्षातील प्रवेशासंदर्भात नुकताच शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, तशी अधिसूचना (RTE Gazette) जारी करण्यात आली आहे. या वर्षातील आरटीई प्रवेश वयोमर्यादा किती असणार? याबाबत पालकांच्या मनात प्रश्न असून, मुलाचे वय किती असणे आवश्यक आहे? याबाबतची माहिती पाहणार आहोत.

$ads={1}

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती? मानिव दिनांकावरून काढा प्रवेशासाठी लागणारे वय..

RTE Admission age Limit 2024

पुढील सन 2024-25 शैक्षणिक वर्षातील नुकताच शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, खाजगी विनाअनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात, जर शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास त्या शाळेत आता RTE 25% प्रवेश मिळणार नाही.

आरटीई प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु झालेली नसून, अद्याप पुढील वर्षातील आरटीई प्रवेश वयोमर्यादासाठी मानिव दिनांक जाहीर करण्यात आलेला नाही, मात्र मागील वर्षातील जाहीर केलेल्या मानिव दिनांकावरून RTE प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या वयोमर्यादा बाबत संभाव्य अंदाज लावता येऊ शकतो.

मानिव दिनांकावरून काढा प्रवेशासाठी लागणारे वय..

मागील शैक्षणिक वर्षातील आरटीई प्रवेश वयोमर्यादा : शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे, परंतू कमाल वयोमर्यादा नाही. 

मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मागील शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा माहे ३१ डिसेंबर २०२३ अखेर पुढील प्रमाणे वय निश्चित करण्यात आलेले होते.

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी शासनाने किमान म्हणजेच कमीत कमी वय निश्चित केली आहे. त्यामध्ये दिनांक ३१ डिसेंबर हा मानीव दिनांक निश्चित केला होता.

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी 2023 मध्ये आवश्यक असणारी किमान वयोमर्यादा पुढीलप्रमाणे होती

RTE addmission age criteria

  • प्ले ग्रुप आणि नर्सरी साठी बालकाचे किमान वय दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी ४ वर्ष असणे आवश्यक आहे.
  • ज्युनियर केजी साठी बालकाचे किमान वय दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी ५ वर्ष असणे आवश्यक आहे.
  • सिनियर केजी साठी बालकाचे किमान वय दिनांक ३१ डिसेंबर २०२२ रोजी ६ वर्ष असणे आवश्यक आहे.
  • इयत्ता १ ली साठी बालकाचे किमान वय दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी ७ वर्ष असणे आवश्यक आहे.{alertInfo}

RTE प्रवेशासाठी बालकाचा जन्म या तारखेदरम्यान  झालेला असावा?

  • प्ले ग्रुप आणि नर्सरी साठी बालकाचा जन्म दिनांक १ जुलै २०१९ ते दिनांक ३१ डिसेंबर  २०२० यादरम्यान झालेला असावा.
  • ज्युनियर केजी साठी  बालकाचा जन्म दिनांक १ जुलै २०१८ ते दिनांक ३१ डिसेंबर  २०१९ यादरम्यान झालेला असावा.
  • सिनियर केजी साठी  बालकाचा जन्म दिनांक १ जुलै २०१७ ते दिनांक ३१ डिसेंबर  २०१८ यादरम्यान झालेला असावा.
  • इयत्ता १ ली साठी  बालकाचा जन्म दिनांक १ जुलै २०१६ ते दिनांक ३१ डिसेंबर  २०१७ यादरम्यान झालेला असावा.

RTE प्रवेशासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा 2023 निश्चिती -  RTE Admission age Limit

प्रवेश वर्गवयोमर्यादादि. ३१ डिसेंबर २०२३ रोजीचे कमाल वय
प्ले ग्रुप / नर्सरी१ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२०४ वर्ष ५ महिने ३० दिवस
ज्युनियर केजी१ जुलै २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९५ वर्ष ५ महिने ३० दिवस
सिनियर केजी१ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८६ वर्ष ५ महिने ३० दिवस
इयत्ता १ ली१ जुलै २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७७ वर्ष ५ महिने ३० दिवस

RTE योजनेंतर्गत प्ले ग्रुप/नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनियर केजी साठी प्रवेश अर्ज भरता येतो का?

RTE योजनेंतर्गत प्ले ग्रुप/नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनियर केजी चे वर्ग असणारी शाळा जर आपल्या घरापासून १ किमी अंतरावर असेल, आणि त्या शाळेने RTE योजनेसाठी नोंदणी केलेली असेल तर ऑनलाईन अर्ज भरता येतो.

आरटीई (RTE 25%) टक्के प्रवेश प्रक्रिया वारंवार विचारले जाणारे प्रश्न 

पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली; केंद्र सरकारचे सर्व राज्यांना निर्देश

$ads={2}

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी पालकांना या तारखेनंतर करता येणार अर्ज

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी लागणारे 'ही' आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा!

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा