Thane Municipal Corporation Recruitment 2024 : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध ३० पदांच्या तब्बल २९३ जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे, तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या पदाच्या त्या-त्या संवर्गानुसार थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहावयाचे आहे, सविस्तर तपशील जाणून घ्या.
$ads={1}
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत मोठी भरती; सविस्तर तपशील जाणून घ्या
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत 293 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार असून, यामध्ये सर्वाधिक जागा ह्या परिचारिका / स्टाफ नर्स, प्रसाविका पदाच्या असून, इतर पदाच्या रिक्त जागा खालीलप्रमाणे पहा
- स्त्रीरोग तज्ञ - 20
- बालरोग तज्ञ - 04
- शल्य चिकित्सक - 04
- फिजिशियन - 04
- भुलतज्ञ - 0
- नेत्र शल्य चिकित्सक - 04
- वैद्यकीय अधिकारी - 12
- परिचारिका / स्टाफ नर्स - 100
- प्रसाविका - 100
- बायोमेडिकल इंजिनियर - 01
- फिजियोथेरपिस्ट - 01
- डायटेशियन - 01
- ऑक्युपेशनल थेरपिस्ट - 01
- स्पिच थेरपिस्ट - 01
- मेडिकल रेकॉर्ड किपर - 03
- सायकॅट्रिक कौन्सिलर - 02
- पब्लिक हेल्थ नर्स - 01
- वैद्यकीय समाजसेवक अधिक्षक - 03
- सायकॅट्रिक सोशल वर्कर - 02
- ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर - 02
- औषध निर्माण अधिकारी (मिश्रक) - 08
- दंत हायजिनिस्ट - 01
- सी.एस.एस.डी.सहायक - 03
- इलेक्ट्रिशियन - 02
- उप ग्रंथपाल - 01
- ग्रंथालय सहाय्यक - 01
- क्युरेटर ऑफ मुझियम - 02
- आरोग्य निरीक्षक - 02
- आर्टिस्ट - 01
- फोटोग्राफर - 01
- एकुण जागा - 293
आवश्यक वयोमर्यादा : शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय उमेदवारासाठी ४३ वर्षे राहील.
संगणक हाताळणी/वापराबाबतचे ज्ञान : शासन निर्णय दिनांक २७ जुन २०२३ रोजीच्या सेवाप्रवेश नियम २०२३ मध्ये विहित केलेल्या अर्हतेव्यतिरिक्त गट-ड वर्ग वगळता इतर पदांकरीता संगणक हाताळणी/वापराबाबतचे ज्ञान (महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS- CIT किंवा DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (इत्यादी) आवश्यक असेल.
मुलाखतीचे ठिकाण : के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे खालील पदासाठी त्या-त्या संवर्गाच्या समोर दर्शविलेल्या दिनांकास सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (Walk In Interview) उपस्थित रहावे.
सदरची जाहिरात https://thanecity.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
इतर महत्वाचे अपडेट : विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याची तारीख आणि ठिकाणामध्ये बदल!