Department of Sainik Welfare Recruitment : सैनिक कल्याण कार्यालयात विविध पदांसाठी भरती सुरु, सविस्तर तपशील पहा

Department of Sainik Welfare Recruitment : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेची पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, यामध्ये एकूण ६२ जागांसाठी भरती करण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचूनच अर्ज करावा. सविस्तर तपशील पहा.

$ads={1}

सैनिक कल्याण कार्यालयात विविध पदांसाठी भरती सुरु, सविस्तर तपशील पहा

Department of Sainik Welfare Recruitment

कल्याण संघटक-४०, वसतिगृह अधीक्षक-१७, कवायत प्रशिक्षक-०१, शारीरिक प्रशिक्षण निदेशक-०१, तर गट "क" या पदाकरीता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधीक्षिका, गट-क-०३ या पदाकरीता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांपैकी ०१ पद हे अपंग संवर्गातून किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता उपलब्धतेनुसार भरण्यात येणार आहे.

एकूण जागा : 62

वेतनश्रेणी ( Pay Scale ) : वरील सर्व पदांकरीता सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission)  S-8 मध्ये 25,500-81,100/- अधिक नियमानुसार भत्ते

महत्वाच्या तारखा

  • Starting Date for submission of online Application 12th Feb 2024 – 11:00 AM
  • Closing Date for submission of online Application 3rd March 2024 – 06:00 PM

ही भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांच्या मार्फत होणार आहे. परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब-बेस्ड (Web-based) ऑनलाईन अर्ज https://mahasainik.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर Recruitment Tab येथे ३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर सदर वेबलिंक बंद होणार असल्याचे सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. आवश्यक पात्रता व रिक्त पदांचा तपशील जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात पहा.

मूळ जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज येथे करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया सुरू
आरोग्य विभागामध्ये मेगा भरती, ऑनलाईन अर्ज करा

$ads={2}

Previous Post Next Post