Employee News : राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत महत्वाची बैठक संपन्न

Employee News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या विविध मागण्यांबाबत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री श्री.केसरकर यांची भेट घेतली, यावेळी विविध मागण्यांबाबत चर्चा करून महत्वाचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले आहे.

$ads={1}

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

employee news

संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळच्या शिष्टमंडळाने मंत्री श्री.केसरकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्री श्री.केसरकर यांनी शालेय शिक्षण विभागाला निर्देश देऊन यापूर्वीच कार्यवाही सुरू केल्याबद्दल सांगितले, महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

राज्यातील शिक्षकांची पदभरती (Mahateacher Recruitment 2024) प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे देखील तातडीने भरण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. 

कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागू करण्यात आले आहे. अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन करण्यात आले आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात देखील भरघोस वाढ करण्यात आली आहे. अन्य मागण्यांबाबत देखील शासन सकारात्मक असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा