Employees Earned Leave Government Decision : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अर्जित रजेचे रोखीकरण देय असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबतचा एक महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित केला आहे, त्यानुसार आता सदर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचनेनुसार शिल्लक अर्जित रजेचे रोखीकरण मिळणार आहे.
$ads={1}
अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित
महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम १६ मधील खालीलप्रमाणे पोटनियम क्र. १८ (अ) व २९ येथे नमूद कर्मचा-यांनाच रजा रोखीकरण लागू राहील.
१८ (अ) जर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाव्यतिरिक्त (परंतु उप-मुख्याध्यापकासहित) एखादा स्थायी कर्मचारी मोठया सुट्यांना हक्कदार असूनही एखाद्या वर्षात पूर्ण मोठया सुट्यांचा किंवा त्यांच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यात प्रतिबंध झालेला असेल तर, त्याबद्दल त्याला पूर्ण सुटीशी त्याने सुटीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक ३० दिवसांच्या अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या संख्याऐवढी अर्जित रजा अनुज्ञेय राहील.
(२९) ज्याला पोट-नियम (१८) च्या तरतूदी लागू आहेत असा कर्मचारी धरुन नियत वयोमानामुळे सेवानिवृत्त होणारा कोणीही कर्मचारी, सेवानिवृत्तीच्या वेळी त्याच्या खाती ३०० दिवस इतक्या कमाल मर्यादेपर्यंत जितकी अर्जित रजा शिल्लक असेल तेवढया रजेच्या बाबतीतील रजावेतनाइतकी रोख रक्कम मिळण्यास पात्र असेल.
करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक ५ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ३ वगळण्यात येत आहे. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. (शासन निर्णय)
राज्यातील या कर्मचाऱ्यांचे समायोजन होणार, विविध मागण्यांसंदर्भात बैठकीत निर्णय
महत्वाची अपडेट! राज्यातील आशा सेविकांच्या मागण्यांबाबत विधानसभेत चर्चा
$ads={2}