Asha Worker Latest Salary News : मुंबईतील आझाद मैदानावर आशा सेविकांचे वेतनवाढीसह (Asha Worker Salary) व अन्य प्रलंबित मागण्यासांठी आंदोलन सुरू आहे, सरकारने राज्यातील आशा सेविकांच्या मागण्या मान्य कराव्यात. त्यांना न्याय द्यावा, याबाबतचा विरोधी पक्षनेते विजय वडेटि्टवार यांनी विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला होता, यावर राज्यसरकारच्या वतीने मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर विधानपरिषदेत आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासनाची बाजू स्पष्ट केली आहे.
$ads={1}
आशा सेविकांच्या मागण्यांबाबत विधानपरिषदेत चर्चा
Asha Worker Salary : वाढीव वेतनासह अन्य मागण्यांबाबत जोपर्यंत शासन निर्णय जारी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची आशा सेविकांची भूमीका आहे. या आशा सेविकांना सरकारने न्याय दिला पाहिजे, अशी मागणी दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेटि्टवार यांनी विधानसभेमध्ये सरकारकडे केली.
आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबईतील आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेल्या आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते विजय वडेटि्टवार यांनी विधानसभेमध्ये याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, शासन आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. चर्चा करून आशा सेविकांचे प्रश्न सोडवले जातील, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
राज्यातील या कर्मचाऱ्यांचे समायोजन होणार, विविध मागण्यांसंदर्भात बैठकीत निर्णय
राज्यातील अंगणवाडी, कंत्राटी तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारचे 3 मोठे निर्णय!महायुती सरकारला आशा सेविकांची चिंता नाही. pic.twitter.com/L0pCCrgCUk
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 26, 2024
गुड न्यूज! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!