राज्यातील अंगणवाडी, कंत्राटी तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारचे 3 मोठे निर्णय!

Employees Latest Decision : राज्यातील अंगणवाडी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी 3 महत्वाचे निर्णय, दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहे, याबाबतचा एक महत्वाचा शासन निर्णय २६ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

$ads={1}

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ

Employees Latest Decision

राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ  बैठकीत घेण्यात आला. 

हा लाभ कर्मचा-यांना 1 एप्रिल,2022 पासून ते त्यांना ग्रॅज्युईटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय  होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकणे या प्रकरणी देण्यात येईल. हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक 30एप्रिल 2014 मध्ये नमूद  केलेल्या सुत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत लाभ देण्यास व याकरिता  येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली. (शासन निर्णय)

राज्यातील कंत्राटी दिव्यांग शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू

समग्र शिक्षा अंतर्गत राज्य शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार दिव्यांग जिल्हा समन्वयक, विशेष तज्ज्ञ शिक्षक व विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्याच निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याबाबतचा शासन निर्णय २६ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. याचा लाभ 6 दिव्यांग जिल्हा समन्वयक, 52 विशेष तज्ज्ञ व 158 विशेष शिक्षक अशा 216 कर्मचाऱ्यांना मिळेल. (शासन निर्णय)

निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात भरीव वाढ

राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपये ठोक वाढ करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सर्व शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या (कनिष्ठ आणि वरिष्ठ)  विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 1 मार्च 2024 पासून महागाई भत्त्यासह प्रति महिना 10 हजार रुपये वाढ करण्यात येईल.

गुड न्यूज! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!
राज्यातील या कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन मंजूर, शासन निर्णय जारी

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा