ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा! ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री वयोश्री योजना' सुरू, कोणते लाभ मिळणार? पहा..

Mukhya Mantri Vyoshree Yojana launched : राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री वयोश्री योजना' सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठांमध्ये वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे. तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे, योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन, प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थींना 3 हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने निर्गमित केला आहे.

$ads={1}

ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा! ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री वयोश्री योजना' सुरू

Mukhya Mantri Vyoshree Yojana launched

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. 

असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण (Population Based Screening) व 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रिनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल.

या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे, लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, बँक खाते यांची माहिती गोळा करणे इ. कामे नोडल एजन्सी/केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था (CPSU) यांच्या माध्यमातून आयुक्त, समाजकल्याण पुणे यांच्याद्वारे करण्यात येईल. 

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड, योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरीता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरीता आयुक्त, महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली  समिती गठीत करण्यात करण्यात येईल.असेही नमूद करण्यात आले आहे.

मोठी बातमी! राज्यातील शाळांची वेळ बदलली, आता ‘या’ वेळेत भरणार शाळा

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभ | (Mukhya Mantri Vyoshree Yojana)

सदर योजनेचे ध्येय व उद्दिष्ट

राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी रु. ३०००/- पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे.

योजनेचे स्वरूप

  • सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/ दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने/ उपकरणे खरेदी करता येतील. 
  • उदा:- श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फो वॉकर, कमोड चेअर, सर्वाइकल कॉलर इ.
  • तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र / प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.

निधी वितरण / अर्थसहाय्य

  1. राज्य शासनातर्फे १००% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल.
  2. थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणाली द्वारे रु.३०००/- च्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येईल.

शिबीराचे आयोजन

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण (पॉप्युलेशन बेस्ड स्क्रिनिंग) व माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रिनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. अशाप्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल. (याबाबतची संपूर्ण माहितीसाठी शासन निर्णय डाउनलोड करा)

गुड न्यूज! कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात तब्बल 10 हजारांची वाढ; सुधारित शासन निर्णय

आरोग्य विभागातील या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य


Previous Post Next Post