Sales Tax Inspector Final Result :: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ५ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या एकूण १५९ पदांचा अंतिम निकाल १५ एप्रिल, २०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे.
$ads={1}
महाराष्ट्र राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर, अवधूत अनिल दरेकर हे राज्यात प्रथम
या परीक्षेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत अनिल दरेकर हे राज्यात प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून पुणे जिल्ह्यातील अश्लेषा शशिकांत जाधव, ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत. मागासवर्गवारीतून कोल्हापूर जिल्ह्यातील रोहित विठ्ठल बेहेरे हे राज्यात प्रथम आले आहेत.
उमेदवारांच्या माहितीसाठी या परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी https://mpsc.gov.in/ आयोगाच्या संकेतस्थळास भेट द्यावी असे आयोगाने कळविले आहे.
मोठी बातमी! अखेर आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरु
महावितरण कंपनीमध्ये नवीन सरळसेवा भरती सुरु
राज्यातील असंघटित कामगारांसंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय!
$ads={2}
राज्यात तब्बल 17 हजार 499 पदांची पोलीस भरती सुरु
सुवर्णसंधी! या विभागात 468 जागांसाठी नवीन मोठी भरती