Contractual Employee Regularization Latest News : राज्यातील आदिवासी विकास विभागातील रोजंदारीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले असून, या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित करण्यात आले आहे.
राज्यातील ६४५ कर्मचारी शासन सेवेत नियमित
एप्रिलमध्ये आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या १० वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांना ६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार सेवेत नियमित करण्याचा निर्णय घेतला.