WRD Exam Date : जलसंपदा विभागांतर्गतची गट ब व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील १४ संवर्गातील एकूण ४,४९७ पदांच्या सरळसेवा भरती करीता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून WRD विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोव्हेंबर महिन्यात अर्ज मागविण्यात आले होते. आता या पदाच्या परीक्षेची तारीख वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
$ads={1}
जलसंपदा विभाग सरळसेवा भरती परीक्षेची तारीख जाहीर
जलसंपदा विभागांतर्गतची गट ब व गट क संवर्गातील खालील पदांसाठी भरती होत असून, परीक्षा दिनांक २७ डिसेंबर २०२३ ते दिनांक २ जानेवारी २०२४ या कालावधीत घेण्यात येणार आहे.
- वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब
- निम्नश्रेणी लघुलेखक
- कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
- भूवैज्ञानिक सहाय्यक
- आरेखक
- सहाय्यक आरेखक
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
- प्रयोगशाळा सहाय्यक
- अनुरेखक
- दप्तर कारकुन
- मोजणीदार
- कालवा निरीक्षक
- सहाय्यक भांडारपाल
- कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
जलसंपदा विभागांर्तगतची भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील परीक्षाबाबतचे वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.
महत्वाची अपडेट! तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर
जलसंपदा भरती हॉल तिकीट
वेळापत्रकाच्या अनुषंगाने उमेदवारांस परिक्षा दिनांक, वेळ व केंद्र याबाबतचा तपशिल प्रवेश पत्रामध्ये नमूद करणेत येईल. तसेच सर्व उमेदवारांना प्रवेश पत्र ई मेलव्दारे पाठविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत विभागात मोठी भरती जाहिरात पहा
HDFC बँक देत आहे 75,000 रु शिष्यवृत्ती! त्वरित येथे करा अर्ज
$ads={2}