Government Employees Allowance : गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांना दरमहा 5 हजार रुपये भत्ता मंजूर

Government Employees Allowance : राज्यातील मंत्रालायीन लिपिक टंकलेखकांसाठी राज्य सरकारने विशेष भत्ता मंजूर केला आहे, दरमहा 5000 हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे, याचा लाभ 1 हजार 891 कर्मचाऱ्यांना मिळणार असून, याबाबत वित्त विभागाने यास मंजुरी दिली आहे.

$ads={1}

गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांना दरमहा 5 हजार रुपये भत्ता मंजूर

government employees allowance

मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरुप लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.  या निर्णयामुळे 11 कोटी 34 लाख 60 हजार एवढ्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे.  सध्या मंत्रालयातल्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये लिपिक-टंकलेखकांची संख्या 1891 इतकी असून त्यांना याचा लाभ मिळणार आहे.

मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा 5 हजार रुपये ठोक भत्ता देण्याचा निर्णय ४ जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

मंत्रालयामध्ये नव्याने लिपिक-टंकलेखक पदावर रुजू झालेले कर्मचारी हे अपुरी आणि महागडी निवास व्यवस्था, जिकीरीचा प्रवास, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात तसेच जवळच्या उपनगरात भाडे तत्वावर घरे उपलब्ध न होने या कारणांमुळे अल्पावधीत सेवा सोडून जाण्याचे प्रमाण अधिक आहे.  यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, राज्य सरकारचा मोठा निर्णय!
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा