Anganwadi Sevika Strike : राज्यातील अंगणवाडी सेविकांचा दिनांक ३ डिसेंबर २०२३ पासून राज्यभरात संप सुरूच आहे, दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी आझाद मैदान येथे सुरु असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या मोर्च्याच भेट देऊन संवाद साधला, यावेळी मांडलेले प्रमुख मुद्दे...
$ads={1}
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची (Anganwadi employees) पदे वैधानिक असून त्यांना वेतनश्रेणीसह ग्रॅच्युईटी (Gratuity), भविष्य निर्वाह निधी आदी लाभ देण्यात यावा. तसेच अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार रुपये व मदतनिसांना दरमहा २० हजार रुपये मानधन द्यावे.
महागाई निर्देशांकानुसार दर सहा महिन्यांनी मानधनांमध्ये वाढ करावी. महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल कडून अंगणवाड्यासाठी पाच हजार ते आठ हजार भाडे मंजूर करावे. आहाराचा आठ रुपये दर अत्यल्प आहे, त्यामध्ये वाढ करून सर्वसाधारण बालकांसाठी १६ रुपये व अति कुपोषित बालकांसाठी २४ रुपये करावा. अशा अन्य मागण्यासाठी राज्यभरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय!
अंगणवाडी कर्मचारी मोर्चा - मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी साधला संवाद - प्रमुख मुद्दे
अंगणवाडी कर्मचारी मोर्चा | प्रमुख उपस्थिती - पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | आझाद मैदान, मुंबई - #LIVE https://t.co/5g7lcWLEek
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 3, 2024