Anganwadi Strike Latest News : मोठी बातमी! अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार

Anganwadi Strike Latest News : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सुरु असलेल्या संपाबाबत एक महत्वाची अपडेट, राज्यभरात  अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी  बेमुदत संप पुकारला आहे, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करणार असल्याची ग्व्हाही नुकतीच मा. मंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे.

$ads={1}

मोठी बातमी! अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार

Anganwadi Strike Latest News

राज्यभरात विविध जिल्ह्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा सुरु असून, यादरम्यान कोल्हापूर जिल्ह्याचे मा. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये कर्मचाऱ्यांची भेट घेतली असता, अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने प्रलंबित व न्यायिक मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी मा. हसन मुश्रीफ म्हणाले की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अडचणींची आणि प्रश्नांची मला जाणीव आहे. हा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडू,अशी ग्वाही दिली. कामगार नेते अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. पदाधिकाऱ्यांसह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीच्या काळात बहुतांशी अंगणवाडी सेविकांच्या नेमणुका मीच केलेल्या आहेत. त्यांच्या अडीअडचणी आणि प्रश्नांची मला जाणीव आहे. कागलमध्ये कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने आयोजित मोर्चासमोर त्यांनी मनोगत व्यक्त केले.

अंगणवाडी कर,कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची (Anganwadi employees) पदे वैधानिक असून त्यांना वेतनश्रेणीसह ग्रॅच्युईटी (Gratuity), भविष्य निर्वाह निधी आदी लाभ देण्यात यावा. तसेच अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार रुपये व मदतनिसांना दरमहा २० हजार रुपये मानधन द्यावे. 

महागाई निर्देशांकानुसार दर सहा महिन्यांनी मानधनांमध्ये वाढ करावी. महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल कडून अंगणवाड्यासाठी पाच हजार ते आठ हजार भाडे मंजूर करावे.  आहाराचा आठ रुपये दर अत्यल्प आहे, त्यामध्ये वाढ करून सर्वसाधारण बालकांसाठी १६ रुपये व अति कुपोषित बालकांसाठी २४ रुपये करावा.

यावेळी कॉम्रेड जयश्री पाटील, कॉम्रेड आप्पा पाटील, विद्या कांबळे, सुरेखा कांबळे, शमा पठाण, अर्चना पाटील, उज्वला बंडगर, अनिता माने, भारती कुरणे आदी पदाधिकाऱ्यांसह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारचा हा मोठा निर्णय पहा
सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू, अधिसूचना पहा

Previous Post Next Post