Anganwadi Workers Strike : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात लाभार्थी आहारापासून वंचित राहू नये, यासाठी सरकारचा महत्वाचा निर्णय!

Anganwadi Workers Strike : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका यांनी विविध मागण्यासाठी दिनांक 4 डिसेंबर 2023 पासून राज्यव्यापी संप पुकारल्यामुळे अंगणवाडी केंद्र बंद आहेत, आता यांसदर्भात राज्य सरकारने महत्वाच्या सूचना संबंधित जिल्ह्यांना दिल्या आहेत.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात लाभार्थी आहारापासून वंचित राहू नये, यासाठी सरकारचा महत्वाचा निर्णय!

Anganwadi Workers Strike

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या (Anganwadi employees) बेमुदत संपामुळे सध्या विद्यार्थ्यांना आहार वाटप बंद असल्याने लाभार्थी आहारा पासून व पूर्व शालेय शिक्षणा पासून वंचित राहत आहेत. या संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार अंगणवाडीतील लाभार्थ्यांना वर्षातून किमान 300 दिवस आहार पुरवठा करणे बंधनकारक केलेले आहे. 

या संदर्भात मा.आयुक्त कार्यालयामार्फत अंगणवाडी सेविकेच्या संपामुळे किंवा इतर आपतकालीन परिस्थिती मध्ये देखील लाभार्थी आहारा पासून वंचित राहू नये या करीता आहार वाटपाचे पर्यायी व्यवस्था करणे बाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. 

त्यानुसार आता काही जिल्ह्यात अंगणवाडी पर्यवेक्षिका (Anganwadi supervisors) व ग्रामसेवक यांनी अंगणवाडी केंद्र (Anganwadi centers) ही शासकीय मत्ता असल्यामुळे अंगणवाडी केंद्राची चावी पंचनामा करून ग्रामपंचायत स्तरावर जमा करणेची कार्यवाही तात्काळ करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.

तसेच ग्रामपंचायत कार्यालयात जमा केलेल्या अंगणवाडी केंद्राच्या चाव्या आशा कार्यकर्ती यांचे कडे हस्तांतरीत करण्यात याव्यात, आशा कार्यकर्ती यांनी चावी घेवून अंगणवाडी केंद्रच्या सेवा (आहार उतरवून घेणे लसीकरण, इत्यादी) लाभार्थी यांना देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच संप कालावधीत जिल्हा परिषद शाळा परिसरातील अंगणवाडी केंद्र आहेत, त्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार अंगणवाडी केंद्र मधील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना देखील वाटप करण्याबाबत जालना जिल्हा परिषदेने संबंधिताना सूचना देण्यात आल्या आहेत.

मोठी बातमी! अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा