गुड न्यूज! समग्र शिक्षा योजना योजनेंतर्गत नियुक्त विशेष शिक्षकांचे थकीत वेतन मंजूर, शासन आदेश जारी..

Special Teachers Salary Arrears : केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा योजना (माध्यमिक स्तर) योजनेंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक (Special Teacher) यांच्या थकीत वेतन अदा करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

$ads={1}

समग्र शिक्षा योजना योजनेंतर्गत नियुक्त विशेष शिक्षकांचे थकीत वेतन मंजूर

Special Teachers Salary Arrears

केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण (Inclusive Education) योजना (माध्यमिक स्तर) योजनेंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक (Special Teacher) यांनी थकित मानधनाप्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल केलेल्या आहेत. यासंदर्भात मा. उच्च न्यायालयाने रिट याचिका व इतर संलग्न याचिकां प्रकरणी दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी विशेष शिक्षकांना मानधन अदा करणेबाबत आदेश पारीत केले आहे.

मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी न्यायालयीन प्रकरण विचारात घेता एकत्रित रित्या मार्च २०२४ पर्यंत विशेष शिक्षकांच्या मानधनाकरीता आवश्यक असणारा एकूण पंधरा कोटी चौसष्ट लाख पन्नास हजार फक्त इतका निधी मानधन अदा करण्यासाठी वितरीत करण्याची विनंती केली होती.

त्यानुसार आता सदर विनंतीस अनुसरुन समग्र शिक्षा योजनेंतर्गत राज्य हिस्स्याचे लेखाशिर्ष अंतर्गत सहायक अनुदाने (वेतनेतर) मधून सदर निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक परिषद, मुंबई यांना वितरीत करण्यास  वितरीत करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

मा. उच्च न्यायालयाने सदर याचिका प्रकरणी वेळोवेळी पारित केलेल्या आदेशानुसार संबंधीत याचिकाकर्ते यांना प्रत्येक महिन्याचे मानधन त्यांच्या खात्यात पुढील महिन्याच्या १५ तारखेपूर्वी जमा करणे बाबत शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

समग्र शिक्षा योजनेतून पगार होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय!
कंत्राटी कर्मचारी नियमित होणार, 90 टक्के मागण्या मान्य!

सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू, अधिसूचना पहा

Previous Post Next Post