राज्यातील या अस्थायी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय! नवीन शासन निर्णय जारी...

Employees Latest GR : राज्यातील पाणीपुरवठा योजनांवरील रूपांतरित नियमित अस्थायी (CRT) आस्थापनेवरील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला असून, आता त्यानुसार दिनांक 27 डिसेंबर रोजी नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

$ads={1}

राज्यातील या अस्थायी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय! नवीन शासन निर्णय

Employees Latest GR

जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांवरील रुपातंरीत नियमित अस्थायी (CRT) आस्थापनेवरील कार्यरत पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रीमंडळाने दिनांक १७ नोव्हेंबर, २०२२ च्या बैठकीमध्ये घेतला असून, त्यानुषंगाने दिनांक ३० जानेवारी, २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 

सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनासाठी संबधित जिल्हा परिषदांना कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सन २०२३-२४ या अर्थिक वर्षातील नियमित वेतन/भत्त्यासाठी अनुदान वितरीत करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक २७ डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न मिटला असून, प्रलंबित वेतन आणि भत्ते लवकरच कर्मचार्यांना मिळणार आहे.

कंत्राटी कर्मचारी नियमित होणार, 90 टक्के मागण्या मान्य!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारचा हा मोठा निर्णय पहा
सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू, अधिसूचना पहा


Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा