Employees Latest News : मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मंजूर पदांशिवाय अनधिकृतपणे संस्था स्तरावर शासन मान्यतेशिवाय शासन निर्णयातील २२ उच्च माध्यमिक शिक्षकांच्या नियुक्तीस एक विशेष बाब म्हणून मान्यता देवून उच्च माध्यमिक आश्रमशाळांतील रिक्त पदावर केलेले तात्पूरते समायोजन दिनांक २६ डिसेंबर रोजीच्या आदेशाद्वारे रद्द करण्यात आले आहे.
$ads={1}
राज्यातील या कर्मचाऱ्यांना नव्याने निर्माण होणाऱ्या पदांवर रुजू व्हावे लागणार
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सध्या सुरु असलेल्या राज्यातील १४१ खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमाशाळेच्या विज्ञान शाखेसाठी वाढीव प्रत्येकी २ विषय शिक्षकांची पदे, अशी एकूण २८२ शिक्षकांची पदे दिनांक २६ डिसेंबर रोजीच्या आदेशान्वये मंजूर करण्यात आली आहेत.
त्यानुसार आता या शिक्षकांना त्यांनी त्यांच्या मूळ आश्रमशाळेत विज्ञान शाखेसाठी नव्याने निर्माण होणाऱ्या २ उच्च माध्यमिक शिक्षक पदांवर तात्काळ रुजु व्हावे. सदर संस्थांनी संबंधितांना नव्याने निर्माण होणाऱ्या पदावर तात्काळ रुजु करून घ्यावे. अशाप्रकारे समायोजनाद्वारे सदर २२ उच्च माध्यमिक शिक्षक त्यांच्या मूळ आस्थापनेवर रुजू झाल्याने या आश्रमशाळांतील शिक्षक संख्या ८ होईल सबब, अन्य कोणतेही वाढीव पदे या आश्रमशाळांना अनुज्ञेय ठरणार नाही. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील आश्रमशाळांसाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!
या निर्णयामुळे उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या (कनिष्ठ महाविद्यालय) विज्ञान शाखेतील सर्व शिक्षकांचा कार्यभार (कमीत कमी १७ ते १९ तासिका कालावधी) शालेय शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या धोरणानुसार असल्यासच त्यांना पूर्णवेळ शिक्षक समजण्यात येईल.
तसेच, सदर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली- १९७७, १९८१ व २००६ तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले नियम/अधिनियम, शासन निर्णयातील तरतुदी, अटी व शर्ती लागू राहतील.
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतर व्यावसायिक (अभियांत्रिकी/वैद्यकीय) अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी NEET/JEE/CET सारख्या तांत्रिक परिक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात.
तथापि, आश्रमशाळेत स्वतंत्र विषय शिक्षक नसल्याने व आर्थिक स्थितीमुळे निवासी विद्यार्थ्यांना खाजगी प्रशिक्षण घेता येत नाही.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व त्यांच्या भावी कारकिर्दीचा (Career) चा विचार करता आदिवासी विकास विभागातील उच्च माध्यमिक आश्रमशाळांप्रमाणे या विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या उच्च माध्यमिक आश्रमाशाळेच्या (कनिष्ठ महाविद्यालय) विज्ञान शाखेत जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व गणित या विषयाकरीता स्वतंत्र पूर्णकालीन शिक्षक आवश्यक असल्याने, सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.
या विभागांतर्गत सध्या सुरु असलेल्या १४१ अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमाशाळेच्या कला/वाणिज्य व विज्ञान या दोन विद्याशाखांसाठी २ शिक्षकांची पदे, अशी एकूण २८२ शिक्षकांची पदे नव्याने मंजूर करण्याच्या प्रस्तावास सचिव उपसमिती/उच्चस्तर सचिव समितीच्या मान्यतेनंतर दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी मा. मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता प्राप्त झाल्याने १४१ अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमाशाळेच्या कला/वाणिज्य व विज्ञान या दोन विद्याशाखांसाठी ०२ शिक्षकांची पदे, अशी एकूण २८२ शिक्षकांची पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय डाउनलोड करा)
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू, अधिसूचना जारी