महत्वाची अपडेट! केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नती संदर्भात नवीन शासन परिपत्रक जारी..

Kendrapramukh Promotion GR : केंद्रप्रमुख पदाची पदोन्नती प्रक्रीयेची कार्यवाही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार करावी, की ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेतील तरतूदीनूसार कार्यवाही करावी, याबाबत क्षेत्रिय कार्यालयस्तरावर संभ्रम निर्माण होत असतो. यासंदर्भात आता दिनांक २७ डिसेंबर रोजी शासन परिपत्रक काढण्यात आले आहे.

$ads={1}

महत्वाची अपडेट! केंद्रप्रमुखांच्या पदोन्नती संदर्भात नवीन शासन परिपत्रक

Kendrapramukh Promotion GR

शालेय शिक्षण (School Education) विभागाच्या दि.१४  नोव्हेंबर १९९४ च्या शासन निर्णयान्वये राज्यात केंद्रप्रमुखांची पदे निर्माण करण्यात आलेली आहेत. 

त्यानुसार केंद्रप्रमुख (Kendrapramukh) पदाचा मुळ तांत्रिक प्रशासकीय विभाग हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे. त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख पदाची पदनिर्मीती, नियुक्ती, शैक्षणिक अर्हता व पदोन्नतीसंदर्भातील धोरण निश्चितीची कार्यवाही देखिल शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून करण्यात येते.

मात्र, केंद्रप्रमुख हे पद ग्रामविकास विभागाच्या अखत्यारित कार्यरत असल्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून केंद्रप्रमुख पदाबाबत वेळोवेळी विहीत करण्यात आलेल्या धोरणनिश्चितीनूसार महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मधील केंद्रप्रमुख पदाच्या सेवाप्रवेश नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्यवाही करण्याबाबत त्याचप्रमाणे यासंदर्भातील सुधारीत अधिसूचना निर्गमित होईपर्यंत केंद्रप्रमुख संवर्गातील पदोन्नतीसंदर्भात एक महत्वाचे शासन परिपत्रक काढण्यात आले आहे.

परिणामी, प्रत्येक जिल्ह्यात केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नतीसंदर्भात स्वतंत्ररित्या कार्यपध्दती वापरुन वेगवेगळी कार्यवाही केली जाते. त्यानुषंगाने केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नतीच्या कार्यवाहीसंदर्भात राज्यात एकसूत्रता आणण्याच्या दृष्ट्रीने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये आवश्यक त्या सुधारणेसंदर्भातील सुधारीत अधिसूचना निर्गमित होईपर्यंत केंद्रप्रमुख संवर्गातील पदोन्नतीसंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि.१ डिसेंबर २०२२ व दि.२७ सप्टेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार सुधारीत तरतूदीप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. असे कळविण्यात आले आहे.

$ads={2}

त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नतीसंदर्भात शासनाकडे मार्गदर्शनसाठी प्रलंबित प्रकरणाबाबतही नियुक्ती प्राधिकारी तथा सक्षम प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर सदर मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही करावी. असे शासन परिपत्रकात म्हंटले आहे.

समग्र शिक्षा योजनेतून पगार होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय!

सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू, अधिसूचना पहा

मोठी बातमी! अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा