Anganwadi Employees News : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्राधान्याने विचार करा - खासदार सुप्रिया सुळे

Anganwadi Employees News :  अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावा, सध्या देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करावी, ग्रॅज्युएटी, भविष्य निर्वाह निधी लागू करावा, महागाईभत्ता (DA), रजा व इतर भत्ते तसेच अंगणवाडी सहाय्यक व सेविकांचे पगार 18 हजार रुपये वरुन किमान 26 हजार रुपये करण्यात यावेत अशा अन्य मागण्यासंदर्भात बेमुदत संप पुकारला आहे, नुकतेच या कर्मचाऱ्यांची मा. खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली.

$ads={1}

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्राधान्याने विचार करा - खासदार सुप्रिया सुळे

Anganwadi Employees News

राज्यातील गर्भवती माता आणि बालके यांच्या आरोग्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडणाऱ्या अंगणवाडी सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या ४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर आहेत. या महिलांनी भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या.त्या या मागण्यांसाठी अनेक पासून संघर्ष करीत आहेत. परंतु त्यांचा आवाज शासनाला ऐकायला येत नाही, हि मोठी खेदाची बाब आहे. 

वास्तविक अंगणवाडी सेविका या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अतिशय महत्वाचा घटक आहे. त्यांच्या समर्पित कार्याबद्दल शासनाने त्यांच्याप्रती कृतज्ञ असायला हवे. पण प्रत्यक्षात शासन आणि जनता यांना सांधणारा त्या महत्वाचा दुवा असूनही त्यांना योग्य आर्थिक मोबदला मिळत नाही. 

याखेरीज त्यांच्या इतरही मागण्या असून राज्य शासनाने त्यांच्या मागण्यांवर प्राधान्याने विचार करुन सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. असे मा. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून मा. मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने घेतला 14 वर्षांनंतर यशस्वी निर्णय!

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने नुकताच महत्वपूर्ण निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील 13011 अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन करून त्यांना अंगणवाडीचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे तब्बल 14 वर्षांनंतर हा यशस्वी निर्णय घेण्यात आला आहे. कोणते लाभ मिळणार? येथे वाचा...

मोठी बातमी! अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारचा हा मोठा निर्णय पहा
अंगणवाडी सेवीकांच्या वेतनात वाढ करा - खासदार श्रीरंग बारणे

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा