Contract Employee Increase Salary : राज्यातील शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालये व रुग्णालयातील करार पद्धतीने नियुक्त प्राध्यापक, तसेच सहयोगी प्राध्यापकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
करारावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरघोस वाढ!
सध्या कंत्राटी प्राध्यापकांना पन्नास हजार रुपये व सहयोगी प्राध्यापकांना चाळीस हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र आता या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालय व रुग्णालयातील करार पद्धतीने नियुक्त झालेल्या प्राध्यापकांना दरमहा एक लाख वीस हजार (1,20000) रुपये तसेच सहयोगी प्राध्यापकांना दरमहा एक लाख दहा हजार (1,10000) रुपये मानधन वाढ करण्यात आली आहे. सदरचा निर्णय दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
कंत्राटी कालावधी पूर्ण केल्यानंतर नियमित पदावर सामावेजन होणार
समग्र शिक्षा योजना योजनेंतर्गत नियुक्त विशेष शिक्षकांचे थकीत वेतन मंजूर