ब्रेकिंग न्यूज! या कर्मचाऱ्यांना 26 हजार बोनस मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Diwali Bonus : राज्यातील विविध विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचारी तसेच करार पद्धतीने कार्यरत कंत्राटी कर्मचारी, रोजंदारी तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसह दिवाळी बोनस तसेच सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे, नुकतेच नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे, आता दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी 26 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

$ads={1}

या कर्मचाऱ्यांना यावर्षी २६ हजार रुपये सानुग्रह अनुदान

Diwali Bonus latest news

मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी २६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ रोजी केली. मुंबई महापालिकेच्या विविध कामगार, कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची 'वर्षा' शासकीय निवासस्थानी बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केला.

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीनिमित्त २६ हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्याचबरोबर महापालिका कर्मचाऱ्यांना पाच लाख रूपयांपर्यंत गटविमा योजना लागू करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतला.

गेल्या वर्षी दिवाळी सानुग्रह अनुदान देताना पहिल्यांदाच २५०० ने वाढ करण्यात आली होती. यावर्षी त्यात वाढ करून २६ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी रोजंदारीवर काम करणाऱ्या बहुउद्देशीय कामागारांना देखील सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली त्यावर रुग्णालय बहुउद्देशीय कामगार आणि बालवाडी शिक्षिकांना दिवाळी भेट देण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निर्देश दिले.

मोठी बातमी! सलग 10 वर्ष सेवा झालेले कंत्राटी कर्मचारी कायम होणार
मोठी अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना लागू असलेली गट विमा योजना २०१७ पासून बंद होती. ती पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देतानाच त्यात वाढ करून पाच लाखापर्यंतची गट विमा योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आणि ही योजना जानेवारी २०२४ पासून लागू करण्याबाबत प्रशासनाला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले. आशा सेविका यांना एक महिन्याचे वेतन सानुग्रह अनुदान देण्याबाबतही याबैठकीत निर्णय घेण्यात आला.

सरकारचा मोठा निर्णय! कंत्राटी कर्मचारी शासकीय सेवेत कायम; शासन आदेश जारी..

महापालिकेच्या कामगार वसाहतींमध्ये नियमीत स्वच्छता करतानाच तेथील शौचालये, स्वच्छतागृहे यांची दुरुस्ती देखील करण्यात यावी,  असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सफाई कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी यासाठी शिष्यवृती देण्याची देखील कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

'वर्षा' निवासस्थानी मुंबई महापालिकेच्या विविध कर्मचारी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त आय एस चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के एच गोविंदराज, बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, माजी आमदार किरण पावसकर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

कंत्राटी कर्मचारी शासनसेवेत नियमित ! सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता निधी मंजूर; शासन आदेश जारी..

$ads={2}

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा