MMRDA Employees Diwali Bonus : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ४२ हजार ३५० रूपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हे सानुग्रह अनुदान सर्व संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी केली एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; 42 हजार 350 रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी MMRDA चे अध्यक्ष या नात्याने हा निर्णय जाहीर करताना म्हटले आहे की, दिवाळी सणाचा गोडवा द्विगुणित व्हावा यासाठी हा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीएचे कर्मचारी हे एक महत्वाच्या विकास यंत्रणेचे आणि या कुटुंबाचे सदस्य म्हणून काम करतात. या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण होईल, म्हणून हा गेल्या वर्षीच्या तुलनेत सानुग्रह अनुदानात १० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा आनंद बहुमोल आहे.'
वाढीव अनुदान जाहीर केल्याने एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. या निर्णयाचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.
हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी ताजे अपडेट पहा - सरकारी कर्मचारी लेटेस्ट न्यूज - जिल्हा परिषद परीक्षा नवीन वेळापत्रक पहा
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या वाढीव सानुग्रह अनुदानाच्या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. याबाबत त्यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कर्मचाऱ्यांना 26 हजार बोनस मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणाएमएमआरडीएचे आयुक्त डॉ. मुखर्जी यांनी, सानुग्रह अनुदानाचा हा निर्णय म्हणजे एमएमआरडीएच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची खास भेटच ठरेल. कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक आनंदात जाईल, ते प्राधिकरणाच्या कामात आणखी उत्साहाने योगदान देत राहतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
मोठी अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर.@MMRDAOfficial च्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ४२ हजार ३५० रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हे सानुग्रह अनुदान सर्व संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. pic.twitter.com/5HDCamF8tH
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 9, 2023