Electric Vehicles : राज्यातील या शहरात महिलांना इलेक्ट्रिक व्हेईकल मिळणार

Electric Vehicles : महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे आणि महिला सुरक्षा या उद्देशाने राज्यातील 10 महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करणे व सॅनिटरी पॅड संदर्भात नागपूर विधानभवन (Nagpur Vidhan Bhavan) येथे बैठक झाली. या बैठकीस महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.

$ads={1}

महिलांना इलेक्ट्रिक व्हेईकल मिळणार

Electric Vehicles

नागपूर विधानभवन येथे झालेल्या बैठकीत महिलांसाठी पिंक रिक्षा योजनेचा सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री यांनी दिल्या, यामध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल (Electric Vehicles) देण्याचा प्रस्ताव आहे. चांगल्या इलेक्ट्रिक व्हेईकल तयार करणाऱ्या कंपन्यांची याबाबत माहिती घ्यावी. महिलांना फायदा होईल, अशाप्रकारे प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

या महिलांना प्राधान्य

मंत्री श्रीमती तटकरे यांनी पिंक रिक्षा योजनेमुळे महिलांना होणाऱ्या फायद्याविषयीची माहिती दिली. या योजनेंतर्गत एकूण 5 हजार रिक्षा सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये एकल महिला, विधवा, परित्यक्ता यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील या शहरात पिंक रिक्षा सुरू होणार

राज्यातील मुंबई शहर, नवी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व कल्याण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या महानगरांमध्ये पिंक रिक्षा (Pink Riksha) सुरू करण्यात येणार आहे.

महिलांना सॅनिटरी पॅड पुरवण्याबाबत चर्चा

यावेळी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांना सॅनिटरी पॅड (Sanitary Pads) पुरवण्याबाबतच्या योजनेविषयीही सविस्तर चर्चा करण्यात आली. या दोन्ही योजनांविषयीचे सविस्तर आराखडे सादर करुन त्यावर पुढील बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेण्याविषयीही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. 

$ads={2}

तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य विद्युत विभागात मोठी भरती जाहिरात पहा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा