Government Employees Performance : महत्वाची अपडेट! शासकीय कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यमापन लिहिण्यासाठी डेडलाईन निश्चित

Government Employees Performance  : राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणेबाबत महत्वाचे शासन परिपत्रक काढण्यात आले असून, वेळेत कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

$ads={1}

महत्वाची अपडेट! शासकीय कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यमापन लिहिण्यासाठी डेडलाईन निश्चित

government employees performance

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे दरवषी कार्यमूल्यमापन (Performance) अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही दिनांक ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावी याबाबतची सूचना शासन परिपत्रक दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ च्या अन्वये देण्यात आल्या आहेत. तथापि त्यानुसार कार्यमुल्यमापन अहवाल वेळेत लिहिले जात नाहीत असे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

सदर बाब विचारात घेता सर्व आस्थापना, संस्करण अधिकाऱ्यांनी दिनांक १७.११.२०२२ मध्ये दिलेल्या सूचना विचारात घेऊन प्रतिवेदन वर्ष सन २०२२-२३ चे कार्यमूल्यमापन अहवाल विहित वेळेत म्हणजेच दिनांक १५ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच ही मुदत अंतिम असणार आहे.

कार्यमूल्यमापन अहवालाच्या अनुषंगाने करावयाची संपूर्ण कार्यवाही विहित वेळेत केली जाईल याची जबाबदारी संबंधित आस्थापना संस्करण अधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. (परिपत्रक)

नवीन वर्षातील जयंती व राष्ट्रीय दिन कार्यक्रमाची यादी डाउनलोड करा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा