National Day List 2024 : सन २०२४ मध्ये राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने महत्वाचे शासन परिपत्रक निर्गमित केले आहे, त्यानुसार नवीन वर्षातील जयंती व राष्ट्रीय दिन कार्यक्रमाची यादी जाहीर करण्यात आली आहे.
$ads={1}
नवीन वर्षातील जयंती व राष्ट्रीय दिन कार्यक्रमाची यादी जाहीर
सन २०२४ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम परिपत्रकात जोडलेल्या परिशिष्टानुसार मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावेत, असे कळविण्यात आले आहे.
नवीन वर्षातील जयंती व राष्ट्रीय दिन कार्यक्रम साजरे करण्याबाबत महत्वाच्या सूचना जारी
- सन २०२४ मधील राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी (शनिवार व रविवार) आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावेत, अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत.
- विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी.
- भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिनाचा समावेश जयंती कार्यक्रमामध्ये करण्याबाबत वेगळयाने शासन परिपत्रक निर्गमित करण्यात येईल.
नवीन वर्षातील जयंती व राष्ट्रीय दिन कार्यक्रमाची यादी - National Day List 2024
दिनांक २७ डिसेंबर २०२३ चे परिशिष्ट सन २०२४ मध्ये मंत्रालय, शासकीय/निमशासकीय कार्यालयात साजरे करावयाच्या जयंती / राष्ट्रीय दिन कार्यक्रमाची यादी