GMC Nagpur Bharti 2024 : इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या अधिनस्त असलेल्या नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय/दंत/अयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष पदांच्या तब्बल ६८० रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
$ads={1}
जीएमसी नागपूर भरती तपशील - GMC Nagpur Bharti 2024
- पदाचे नाव सवंर्ग - गट-ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष पदे
- विभाग/संस्था - नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय / दंत/ अयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालये
- वेतनश्रेणी - एस-१ (१५०००-४७६००) अधिक महागाई भत्ते व नियमाप्रमाणे इतर भत्ते
- एकुण पदे - ६८०
जीएमसी नागपूर भरती शैक्षणिक अर्हता - GMC Nagpur Bharti Educational Qualification
- उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
वयोमर्यादा
दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजी उमेदवाराचे किमान वय हे १८ वर्षे तर कमाल वय ३८ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. (राखीव प्रवर्गासाठी ५ वर्षाची सूट असणार आहे.)
परीक्षेचे स्वरूप - GMC Nagpur Bharti Exam Syllabus
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी / अंकगणित या विषयावर प्रत्येक २५ प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला २ गुण असणार आहे, असे एकूण १०० प्रश्न २०० गुण या पद्धतीने प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असणार आहे. यासाठी २ तास (१२० मिनिटे) वेळ असणार आहे.
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया / कालावधी
- अर्ज सादर करण्याचा कालावधी - दि. ३०/१२/२०२३ रोजीपासुन दि. २०/०१/२०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यत
- ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक - दि. २०/०१/२०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत
- परीक्षेचा दिनांक व कालावधी - https://gmcnagpur.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.
GMC Bharti Advertisement PDF Download
- PDF जाहिरात / ऑनलाईन अर्ज – GMC Bharti Advertisement PDF Download
- अधिकृत वेबसाईट – https://gmcnagpur.org/recruitments