Maharashtra Legislative Council : विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त विशेष चर्चासत्र; ऐतिहासिक घटना जाणून घ्या

Maharashtra Legislative Council Centenary Festival : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेनुसार विधानपरिषदेचे सदस्य आणि नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशनानिमित्त दिनांक ८ डिसेंबर, २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता विधानपरिषद सभागृह, विधान भवन येथे "महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे महत्वपूर्ण योगदान" या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

$ads={1}

ऐतिहासिक घटना

Maharashtra Legislative Council

देशातील संसदीय लोकशाहीच्या संदर्भात द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधानपरिषदेने उल्लेखनीय योगदान देत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविला आहे. माँटेग्यू-चेम्सफर्ड शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम, १९१९ अन्वये "Bombay Legislative Council" ची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी, १९२१ रोजी टाऊन हॉल मुंबई येथे झाली. नारायण गणेश चंदावरकर यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना होती. 

सन १८६२ ते सन १९२० पर्यंत Governor of Bombay यांच्या अध्यक्षतेखाली  Council चे कामकाज चालत होते. सन १९२१ मध्ये नारायण चंदावरकर यांच्या रुपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषद शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. तथापि, कोविड-१९ महामारीमुळे त्‍यावेळी जाहीर कार्यक्रम घेणे शक्य झाले नाही.

विधानपरिषदेचे सन्माननीय सदस्य आणि नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकार यांना दि. ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले असून यानिमित्त जुन्या आठवणींना तसेच विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी वाटचालीतील हिवाळी अधिवेशनातील वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या प्रसंगांना उजाळा मिळणार आहे.

विधानसभा प्रश्नोत्तरे

राज्यातील या शहरात महिलांना इलेक्ट्रिक व्हेईकल मिळणार

$ads={2}

तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य विद्युत विभागात मोठी भरती जाहिरात पहा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा