Govt Recruitment : राज्य शासनाच्या सर्व विभागांमध्ये सर्व संवर्गातील एकूण मंजूर पदांच्या ३० टक्के पदे रिक्त असल्याबाबत मा. सदस्य श्री.रमेश कराड, श्री. प्रवीण दटके, श्रीमती उमा खापरे, श्री.रमेशदादा पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
सन्माननीय उप मुख्यमंत्री यांनी पुढील गोष्टींचा खुलासा केला आहे.
देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आणि त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांना शासन निर्णय दिनांक ३१/१०/२०२२ अन्वये १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी संबंधित ८० टक्के रिक्त पदे भरण्यास आणि लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ५० टक्के पदे भरण्यास अनुमती देण्यात आली होती.
सदर कालावधी आता संपुष्टात आला असल्याने शासन निर्णय दिनांक ३०/०९/२२ मधील तरतूदी लागू झाल्या आहेत. त्यानुसार ज्या विभाग व कार्यालये यांनी सुधारित आकृतिबंध उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने अंतिम केला आहे त्या विभागांना लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेची १०० टक्के पदे भरण्याची अनुमती देण्यात आली आहे आणि लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ५० टक्के पदे भरण्यास अनुमती देण्यात आली आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी त्याप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
मोठी बातमी! राज्य सरकार जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक
$ads={2}
दहावी पास ते पदवीधारकांसाठी भरती सुरु
'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी