Pandit Deendayal Upadhyay Women's Employment Fair : महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगारांच्या धोरणाची प्रभावीरित्या अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षीत उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नामांकित कंपनीतील नियोक्ते, कारखानदार व इच्छुक उमेदवारांचे एकन्नित रोजगार मेळावे आयोजित करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने सुशिक्षीत नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दि. ११ मार्च, २०२४ रोजी महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
$ads={1}
पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, अमरावती आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती आणि प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट, वलगाव, जि. अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळावा दिनांक ११ मार्च २०२४ रोजी आयोजित करण्यात आला असून, यामध्ये तब्बल १६ विविध पदांच्या ६२७ जागांसाठी भरती होणार आहे.
- एकूण पदे : ६२७
- दिनांक : ११ मार्च, २०२४ (सोमवार)
- वेळ : स. १०.०० वा.
- स्थळ : सिकची रिसोर्ट, वलगाव, जि. अमरावती
रोजगार मेळाव्यात ऑनलाईन Apply करण्यासाठी काय करावे ?
- www.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर भेट दया.
- Employment या टैबवर क्लिक करा.
- Job Seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी /आधार कार्ड क्र. व पासवर्ड साइन इन करा.
- आपल्या होम पेजवरील Job Fair हा पर्याय निवडा.
- District मध्ये Amravati जिल्हा निवडून Filter बटनवर Click करावे. नंतर सदर दिनांकित मेळावा निदर्शनास येईल. त्यासमोर असलेल्या Action बटनच्या खाली View व Apply बटन दिसेल.
- तद्नंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती दिसेल. आपल्या पान्नतेनुसार पदाची निवड करून Apply बटनवर क्लिक करा. । Agree हा पर्याय निवडा.
- शेवटी Successfully Applied for the Job असा Message दिसेल. अशा रितीने आपण ऑनलाईन सहभाग नोंदवावा.
पुढील लिंकवर क्लिक करुन सुध्दा अप्लाय करु शकता. https://shorturl.at/kmGMW तरी इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
अधिक माहितीकरीता संपर्क : सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, अमरावती संकेत स्थळ : www.mahaswayam.gov.in ईमेल: amravatirojgar@gmail.com
गुड न्यूज! अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांची आता 'ही' मागणी मान्य होणार