Employees Salaries : सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्यात आला असून, याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
$ads={1}
राज्यातील या कर्मचाऱ्यांचे वेतन निधी मंजूर, शासन निर्णय जारी
आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नयी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांकरिता मागणी नुसार, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अधिकारी/कर्मचारी यांचे मार्च २०२४ व एप्रिल २०२४ या महिन्याच्या वेतनाकरिता एकूण रु.९०००.०० लक्ष (रुपये नव्यद कोटी फक्त) इतका निधी वितरित व खर्च करण्यास दिनांक १६ एप्रिल रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
मोठी बातमी! कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू, शासन निर्णय जारी
यामध्ये विशेष पोषण आहार कार्यक्रम, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, अंगणवाडी सेवा, वेतन, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ यांच्या कलम १२३ व २६१ अन्वये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान मंजूर करण्यात आले आहे. (शासन निर्णय)
कर्मचाऱ्यांना सुधारित भत्ता मंजूर, शासन निर्णय जारी